- 24 तासात 230 नवीन बाधित
- उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 3974
- जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 9812 वर
- जिल्ह्यात आतापर्यंत 5690 बाधित कोरोनातून झाले बरे
- चंद्रपूर जिल्हा कोरोना अपडेट्स
- वाचा सविस्तर....
आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात पाच बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये, लाखांदूर, भंडारा येथील 46 वर्षीय महिला बाधितेचा समावेश आहे. या बाधितेला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.
दुसरा मृत्यू श्याम नगर, चंद्रपुर येथील 60 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 22 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.
तिसरा मृत्यू बनवाही, नागभिड येथील 65 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.
चवथा मृत्यू ब्रह्मपुरी येथील 70 वर्षीय पुरूष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 22 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.
तर, पाचवा मृत्यू चुनाभट्टी, राजुरा येथील 74 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 25 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. या सर्व मृत्यू झालेल्या बाधितांना कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 148 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 139, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन,यवतमाळ तीन आणि भंडारा एक बाधितांचा समावेश आहे.
जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 149 बाधित, पोंभूर्णा तालुक्यातील दोन, बल्लारपूर तालुक्यातील सात, मुल तालुक्यातील 8, कोरपना तालुक्यातील एक, ब्रह्मपुरी तालुक्यातील 18, वरोरा तालुक्यातील 13, भद्रावती तालुक्यातील पाच, सावली तालुक्यातील 11, सिंदेवाही तालुक्यातील 14, राजुरा तालुक्यातील दोन असे एकूण 230 बाधित पुढे आले आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील गांधिनगर, गुजरी वॉर्ड, पेठ वॉर्ड, मेंढकी, संत रविदास चौक परिसर, शेष नगर परिसरातून बाधित ठरले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर भागातून बाधित ठरले आहे.
भद्रावती तालुक्यातील गुरु नगर, गजानन नगर परिसरातून बाधित पुढे आले आहे. सावली तालुक्यातील व्याहाड, चकपरंजी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव भागातून बाधित पुढे आले आहे.




टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.