शैलेश कोरांगे - प्रतिनिधी
कोरपना -
मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलन समिती कोरपना च्या वतीने कोरपना येथील नगराध्यक्ष कांताबाई भगत यांना मुस्लिम समाजाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यासाठी देण्यात आले. राज्यभर हे आंदोलन सुरु असून खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांच्या मार्फतीने मुस्लिम समाजाचा आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रातील मागासलेपण यामुळे संपूर्ण राज्यभर मुस्लिम समाजाचे अत्यंत शैक्षणिक क्षेत्रात पीछेहाट झाली आहे. शासनामार्फत न्यायमूर्ती सच्चर आयोग, डॉक्टर महमूद रहमान समिती यांनी शासनाला अहवाल सादर करून मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाचा मागासलेपण व आर्थिक शैक्षणिक क्षेत्रात झालेल्या पिछाडी चे सविस्तर अहवाल शासनास सादर करून उपाय योजना सुचविल्या होत्या. त्याच प्रमाणे न्यायालयाने देखील समाजाला शैक्षणिक प्रवाहामध्ये सहभागी करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. मात्र शासनाच्या दुर्लक्षामुळे हा समाज सर्वच क्षेत्रात पिछाडीवर गेला आहे. मुस्लिम समाजाला विकासाच्या प्रवाहामध्ये सहभागी करून घेण्यासाठी शैक्षणिक, आर्थिक व नोकरी मध्ये आरक्षण देण्यात यावे या मागणीचे निवेदन आबिद अली यांच्या नेतृत्वात नदीम शेख, मोहब्बत खान, शहाबाज अली, मसूद पटेल, नादिर कादरी, जब्बार शेख, मोबीन रफिक शेख, समीर शेख, अब्दुल रशीद, मज्जित समशेर यांनी घेराव करून निवेदन दिले. यावेळी नगराध्यक्ष कांताबाई भगत यांनी सदर निवेदन शिफारशी सह मा. मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात असल्याचे सांगितले.




टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.