Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: श्री गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतुकीत बदल
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
श्री गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतुकीत बदल पायी चालणाऱ्या नागरीकांकरीता सुचना आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. ०४ सप्टेंबर २०२५) -   ...
श्री गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतुकीत बदल
पायी चालणाऱ्या नागरीकांकरीता सुचना
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०४ सप्टेंबर २०२५) -
        चंद्रपूर शहरात दिनांक ०६ सप्टेंबर रोजी श्री गणेश विसर्जन मिरवणूक निघणार असून, या मिरवणुकीत जवळपास सर्व सार्वजनिक गणपती मंडळे सहभागी होणार आहेत. मिरवणुकीच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि महिलांना, लहान बालकांना व ज्येष्ठ नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी पोलिस व प्रशासनाने वाहतुकीसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे -
गांधी चौक कडे जाण्यासाठी नागरिकांनी हा मार्ग वापरावा:
  • जटपुरा गेटजवळील डॉ. अल्लुरवार हॉस्पीटल – बैंगलोर बेकरी मार्गे – कस्तुरबा रोड – गिरनार चौक – गांधी चौक.

जटपुरा गेटकडे परत येताना हा मार्ग अवलंबावा:
  • गांधी चौक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – लोकमान्य टिळक विद्यालय समोरून – सामान्य रुग्णालय – छोटा बाजार – जटपुरा गेट.

        यावेळी कोणत्याही नागरिकांनी जटपुरा गेट ते गांधी चौक हा मार्ग उलट दिशेने पायी चालत जाऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच शहरात प्रवेश करताना नागरिकांनी कस्तुरबा रोडने प्रवेश करावा. पोलिस आणि प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे की, नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून मिरवणुकीच्या बंदोबस्तात सहकार्य करावे, ज्यामुळे श्री गणेश विसर्जन उत्सव शांततेत व सुव्यवस्थित पार पाडता येईल.

#ChandrapurTrafficUpdate #GaneshVisarjan2025 #ChandrapurPolice #SafeCelebration #TrafficAdvisory #GaneshFestival #PeacefulVisarjan #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top