Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: चंद्रपूर जिल्ह्यात ५४० जण हद्दपार – पोलिसांची मोठी कारवाई
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपूर जिल्ह्यात ५४० जण हद्दपार – पोलिसांची मोठी कारवाई गणेशोत्सवात शांततेसाठी पोलिसांचा सतर्क पवित्रा आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (...
चंद्रपूर जिल्ह्यात ५४० जण हद्दपार – पोलिसांची मोठी कारवाई
गणेशोत्सवात शांततेसाठी पोलिसांचा सतर्क पवित्रा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०४ सप्टेंबर २०२५) -
        भारताची राज्यघटना सर्वधर्म समभाव व धर्मनिरपेक्षतेचा संदेश देत असताना, काही विघातक प्रवृत्ती समाजात अराजकता माजविण्याचा प्रयत्न करीत असतात. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीच्या काळात शांतता, सामाजिक सलोखा व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.

        पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वात, तसेच पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांनी संयुक्तरित्या कारवाई करत एकूण ५४० विघातक प्रवृत्तीच्या इसमांविरुद्ध प्रस्ताव तयार केला. कलम १६३ (२) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता – २०२३ नुसार, या सर्व इसमांना त्यांच्या संबंधित पोलीस स्टेशन हद्दीत येण्यास मनाई (हद्दपार) करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पोलीस विभागाच्या या धडक कारवाईमुळे गणेशोत्सवाचा उत्साह शांतता व सामाजिक ऐक्यासह साजरा करण्यास निश्चितच मदत होणार आहे.

#ChandrapurPolice #GaneshFestival #PeaceAndHarmony #LawAndOrder #PoliceAction #CommunitySafety #SocialUnity #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top