Mephedrone विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २६ जुलै २०२५) -
स्थानिक गुन्हे शाखा यांनी रामनगर पोलिस ठाणे हद्दीत एम. डी. ड्रग्स विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करून एकूण ६,४०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक २६ जुलै रोजी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपी राहुल अनिल पवार वय २८, रा. चंद्रपूर आणि आरोपी चिनु महेश गुप्ता वय १८ वर्ष ६ महिने, रा. चंद्रपूर यांना अटक करण्यात आली. या दोघांकडून ५.०० ग्रॅम Mephedrone ड्रग, मोबाईल फोन व एक वाहन असा एकूण ६.४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच या प्रकरणात आरोपी आकाश गुप्ता रा. चंद्रपूर हा फरार असून त्याच्या विरोधातही गुन्हा क्रमांक ६०४/२०२५ नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात कलम ८(क), २२(ब), २९ नुसार NDPS Act अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून रामनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दिपक कॉक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोहवा संतोष येलपुलवार, दिनेश अराडे, नितीन रायपुरे, सचिन गुरनुले, गणेश मोहुर्ले, दिपक डोंगरे, पोअं मिलिंद जांभुळे, शंशाक बदामवार, सुमित बरडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.