Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आमदार सुभाष धोटे यांनी मुस्लिम शादीखाण्यासाठी ५० लाख रुपये केले मंजूर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमदार सुभाष धोटे यांनी मुस्लिम शादीखाण्यासाठी ५० लाख रुपये केले मंजूर विजयरावजी बावणे यांनी मुस्लिम बांधवांकरिता शादीखाना मंजूर करून देण्याच...

  • आमदार सुभाष धोटे यांनी मुस्लिम शादीखाण्यासाठी ५० लाख रुपये केले मंजूर
  • विजयरावजी बावणे यांनी मुस्लिम बांधवांकरिता शादीखाना मंजूर करून देण्याचे  दिले होते वचन
  • मुस्लिम समाजाने केले सुभाष धोटे आणि विजयराव बावणे यांचे अभिनंदन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
विजयराव बावणे यांच्या मागणीला  तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत आमदार सुभाष धोटे यांनी मुस्लिम समाजाच्या शादीखान्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
नगरपंचायत कोरपना निवडणुकीच्या वेळी कोरपना नगरपंचायचे शिल्पकार चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजयराव बावणे यांनी मुस्लिम बांधवांकरिता आमदार सुभाष धोटे यांच्या सहकार्याने शादीखाना मंजूर करून देण्याचे वचन दिले होते.
कोरपना नगरपंचायत निवडणुकीत जनतेनी काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवून दिल्यानंतर आपल्या दिलेल्या वचनाला पूर्ण करण्याकरिता आमदार सुभाष धोटे यांच्या कडे विजयराव बावणे यांनी मुस्लिम बाधवांकरिता शादिखाना मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला.
आमदार सुभाष धोटे यांनी सुद्धा विजयराव बावणे यांच्या मागणीला तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत मुस्लिम समाजाकरिता शादीखान्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 
विजयराव बावणे यांनी  विकासाची तगमग असणारे आमदार सुभाष धोटे यांचे आभार मानले आहे. तसेच नगरपंचायत कोरपना येथील मुस्लिम समाजाच्या वतीने सुभाष धोटे आणि विजयराव बावणे यांचे अभिनंदन होत आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top