- नारंडा येथे इयत्ता दहावीचा विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ साजरा
- सामान्य ज्ञान व निबंध स्पर्धा चे बक्षीस वितरण संपन्न
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
तालुक्यातील आदर्श किसान विद्यालय नारंडा येथे निरोप समारंभ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक गुरूमुखी सर, भिमनवार सर, गोरे सर, मोडकवार सर, फुलझेले सर, खामकर सर, धुमाने सर, निवलकर मॅडम, वाभिटकर सर आणि अरुण निरे उपस्थित होते. उपस्थित सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्व शिक्षक आणि 10 वी च्या विद्यार्थ्यांयांनी मीनल जुमनाके, मानसी गाडगे, आकांशा झाडे, दिव्या वांढरे, कुणाल मोहूर्ले, समीक्षा बोरुले, अंकिता ताजने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन मनस्वी कोडापेनी केले. आयोजित सामान्य ज्ञान व निबंध स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक कुणाल मोहुर्ले, द्वितीय क्रमांक, संध्या बोरूले, तृतीय क्रमांक तनु करमानकर ने पटकावला. शरद जोगी यांच्या कडून प्रथम बक्षीस स्वरूपात 1000 रू. देण्यात आले, भारतीय वार्ता चैनल कडून द्वितीय बक्षीस ७०० रु. व आबिद अली साहेब यांच्याकडून तृतीया बक्षीस ५०० रू. देण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.