Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी रोटरी क्लब राजुराचा पुढाकार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मासिक पाळी, स्वच्छता आणि आरोग्यविषयक सवयींबाबत विद्यार्थिनींना माहिती आमचा विदर्भ - अनंता गोखरे  राजुरा (दि. २३ सप्टेंबर २०२६) -        रोटर...
मासिक पाळी, स्वच्छता आणि आरोग्यविषयक सवयींबाबत विद्यार्थिनींना माहिती
आमचा विदर्भ - अनंता गोखरे 
राजुरा (दि. २३ सप्टेंबर २०२६) -
       रोटरी क्लब राजुरा आणि क्रेसाल इंटरप्राईजेस, एमआयडीसी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवाजी महाविद्यालय, राजुरा येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी व आरोग्य जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थिनींमध्ये मासिक पाळीबाबत असलेला संकोच व संभ्रम दूर करून त्यांना आरोग्य, स्वच्छता आणि आत्मविश्वासाबाबत योग्य माहिती मिळावी, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

        मासिक पाळी ही मुलींच्या आयुष्यातील नैसर्गिक प्रक्रिया असून, या काळात आरोग्याची योग्य काळजी घेणे आणि वैयक्तिक स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. याच अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या काळात उद्भवणाऱ्या विविध शारीरिक अडचणी, स्वच्छतेचे महत्त्व, आरोग्यविषयक योग्य सवयी तसेच या नैसर्गिक प्रक्रियेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

        स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. रितू गिरसावळे यांनी विद्यार्थिनींना सलग दीड तास अत्यंत सोप्या, सहज आणि समजेल अशा भाषेत मार्गदर्शन केले. मासिक पाळीच्या काळात घ्यावयाची काळजी, वैयक्तिक स्वच्छता, आरोग्यविषयक सवयी तसेच या काळात येणाऱ्या विविध अडचणींना आत्मविश्वासाने सामोरे जाण्याबाबत त्यांनी माहिती दिली. विद्यार्थिनींच्या मनातील प्रश्न व संभ्रम दूर करण्याच्या दृष्टीनेही या मार्गदर्शनाचा उपयोग झाला. आरोग्याशी संबंधित विषयांवर योग्य आणि शास्त्रीय माहिती मिळणे आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींना मोफत नॅपकिन पॅडचे वाटपही करण्यात आले.

        कार्यक्रमाला श्री शिवाजी महाविद्यालय, राजुराचे उपप्राचार्य राजेश खेरानी, शिवाजी हायस्कूल, राजुराचे मुख्याध्यापक खामकर सर, प्रसिद्ध डॉक्टर नितीन सावलिया, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. रितू गिरसावळे, क्रेसाल इंटरप्राईजेस, एमआयडीसी चंद्रपूरचे जनरल मॅनेजर हेमंत कुमार तेलंग, सेल्स मॅनेजर समीप बांदे, संकेत शेंडे, शिल्पा रंगारी आणि रुबीना आलम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रोटरी क्लब राजुराचे अध्यक्ष राजू गोखरे, सचिव किशोर हिंगाणे, माजी अध्यक्ष कमल बजाज, वैशाली हिंगाणे, दमयंती इंगोले तसेच रोटरी क्लबचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

        विद्यार्थिनींच्या आरोग्याशी निगडित महत्त्वपूर्ण विषयावर जनजागृती करण्यासाठी रोटरी क्लब राजुरा आणि क्रेसाल इंटरप्राईजेस यांनी घेतलेला हा उपक्रम समाजोपयोगी असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले. विद्यार्थिनींना आरोग्यविषयक योग्य माहिती मिळाल्यास मासिक पाळीबाबतचे गैरसमज आणि अनावश्यक संकोच कमी होण्यास मदत होऊ शकते, यावरही यावेळी भर देण्यात आला.

        कार्यक्रमाचे प्रभावी संचालन रोटरी क्लबचे सदस्य केतन जुनघरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक खामकर सर यांनी केले. मासिक पाळी, वैयक्तिक स्वच्छता आणि किशोरवयीन मुलींचे आरोग्य या विषयांवर सातत्याने संवाद आणि जनजागृतीची गरज आहे. याच उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम रोटरी क्लब राजुरा आणि क्रेसाल इंटरप्राईजेस यांच्या सामाजिक बांधिलकीचा भाग ठरला.

#Rajura #RajuraNews #Chandrapur #ChandrapurNews #RotaryClubRajura #MenstrualHealth #MenstrualHygiene #HealthAwareness #GirlsHealth #WomenHealth #PeriodAwareness #PeriodHygiene #HealthAwarenessProgram #StudentHealth #RajuraEducation #ChandrapurEducation #AamchaVidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top