Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पावर लिफ्टिंगमध्ये निमिष पुरीची दमदार कामगिरी; जिल्ह्यात प्रथम क्रमांक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
१९ वर्षांखालील ५३ किलो वजन गटात अव्वल; विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड आमचा विदर्भ - दीपक शर्मा  राजुरा (दि. २३ सप्टेंबर २०२६) -          जिल्ह...
१९ वर्षांखालील ५३ किलो वजन गटात अव्वल; विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. २३ सप्टेंबर २०२६) -
         जिल्हास्तरीय १९ वर्षांखालील ५३ किलो वजन गटातील पावर लिफ्टिंग स्पर्धेत ऍडवोकेट यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी निमिष उद्धव पुरी याने दमदार कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्याची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

          निमिष पुरी हा अँड. यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करत त्याने आपल्या महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. जिल्हास्तरीय पावर लिफ्टिंग स्पर्धेत ५३ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून त्याने आपली क्रीडा गुणवत्ता सिद्ध केली.

या यशामुळे अँड. यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली आहे. निमिषची विभागस्तरीय स्पर्धेसाठी झालेली निवड ही महाविद्यालयासाठीही अभिमानाची बाब मानली जात आहे. निमिषने मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर हे यश मिळविले आहे. त्याच्या या कामगिरीत जिमचे कोच व मार्गदर्शक गौरव भटारकार यांचे मार्गदर्शन तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे सहकार्य महत्त्वाचे ठरले. आपल्या यशाचे श्रेय निमिषने जिमचे कोच व मार्गदर्शक गौरव भटारकार आणि कनिष्ठ महाविद्यालयाला दिले आहे.
         महाविद्यालयाच्या वतीने निमिषच्या यशाचे कौतुक करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष एड. संजय धोटे, कोषाध्यक्ष सतीश धोटे, सचिव डॉक्टर अर्पित धोटे, अनुराधा धोटे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य प्राध्यापक वर्षा पोडे, पर्यवेक्षक प्राध्यापक इरशाद शेख, क्रीडा मार्गदर्शक शिक्षक प्राध्यापक रोहित रांजीकर, प्राध्यापक कल्पना कवाडे तसेच सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वृंद आणि मित्र मंडळाने निमिष उद्धव पुरीचे अभिनंदन केले. विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने निमिषच्या पुढील कामगिरीकडे आता क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. त्याच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात सातत्याने प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळत आहे.

        निमिष पुरीच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गडचांदूर परिसरातूनही त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विभागस्तरीय स्पर्धेतही त्याने उत्तम कामगिरी करावी, अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

#NimishPuri #PowerLifting #PowerLiftingCompetition #Rajura #RajuraNews #Gadchandur #Chandrapur #ChandrapurNews #PowerLiftingMaharashtra #SportsNews #SportsNewsMaharashtra #StudentAchievement #RajuraSports #ChandrapurSports #MaharashtraSports #AamchaVidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top