Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: सार्वजनिक विहिरीला संरक्षणात्मक जाळी; स्वच्छता आणि सुरक्षिततेकडे लक्ष
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नगरसेविका पूनमताई गिरसावळे यांच्या नेतृत्वाखाली विकासकामे आमचा विदर्भ - दीपक शर्मा  राजुरा (दि. ०८ एप्रिल २०२६) -         राजुरा नगर पालिकेत...
नगरसेविका पूनमताई गिरसावळे यांच्या नेतृत्वाखाली विकासकामे
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. ०८ एप्रिल २०२६) -
        राजुरा नगर पालिकेतील प्रभाग क्रमांक ७ मधील अमराई वार्डातील धानोरकर वाडा परिसरात असलेल्या जुन्या सार्वजनिक विहिरीवर नगरसेविका पूनमताई गिरसावळे यांच्या प्रयत्नातून नगर पालिकेकडून संरक्षणात्मक जाळी बसविण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाणारे हे काम पूर्ण झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. नगर परिषद निवडणुकीदरम्यान या विहिरीवर जाळी बसविण्याची मागणी नागरिकांनी नगरसेविका पूनमताई गिरसावळे यांच्याकडे केली होती. निवडून आल्यानंतर त्यांनी नगर परिषदेमध्ये सातत्याने पाठपुरावा करत हे काम पूर्ण करून घेतल्याचे दिसून येते.

        ही सार्वजनिक विहीर अनेक वर्षांपासून उघडी असल्यामुळे परिसरात धोका निर्माण झाला होता. यापूर्वी या विहिरीत बकऱ्या व कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. तसेच काही वर्षांपूर्वी एका इसमाने विहिरीत उडी घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला होता. सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांनी या विहिरीचे पाणी वापरणेही कमी केले होते.

        परिणामी, विहिरीजवळ नगर पालिकेकडून सार्वजनिक बोरवेलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या बोरवेलचा उपयोग गरजू नागरिक, भाजीपाला विक्रेते, स्थानिक दुकानदार तसेच आठवडी बाजारात येणारे नागरिक करत होते. मात्र सध्या ही बोरवेलही निकामी झाली असून ती दुरुस्त करून सुरू करण्याची मागणी स्थानिक दुकानदार व नागरिकांनी नगरसेविका पूनमताई गिरसावळे यांच्याकडे केली आहे.

        यासोबतच गडचांदूर मार्गावरील कच्च्या नाल्यांमधील गाळ काढण्याच्या कामात पूर्वी दिरंगाई होत होती. त्यामुळे पावसाळ्यात पाणी घरात व दुकानात शिरण्याची समस्या उद्भवत होती. मात्र नगरसेविका पूनमताई गिरसावळे यांच्या प्रयत्नातून आता नाल्यांची नियमित साफसफाई होत असून परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्या वेळोवेळी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत उपाययोजना करत असल्याचे यावरून दिसून येत आहे. 

        महिला नेतृत्वामुळे स्वच्छता व विकासकामांकडे विशेष लक्ष दिले जात असल्याचे या कामांवरून स्पष्ट होत आहे. घर आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची सवय असलेल्या महिलांनी आता संपूर्ण प्रभाग स्वच्छ व सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
#RajuraNews #ChandrapurNews #LocalDevelopment #Ward7 #PoonamtaiGirsawale #WomenLeadership #CivicWork #PublicSafety #CleanCity #DevelopmentWork #MaharashtraNews #GroundReport #PositiveNews #UrbanDevelopment #SmartGovernance #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

Next
This is the most recent post.
Previous
थोडे जुने पोस्ट

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top