अरूण धोटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १६ नोव्हेंबर २०२५) -
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी संघटना आणि आरपीआय समर्थित नगरविकास आघाडीने आज राजुरा नगरपरिषद निवडणुकीत शक्तीप्रदर्शन करत नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार पदाधिकारी अरूण धोटे यांचा उमेदवारी अर्ज प्रचंड उत्साहात दाखल केला. दुपारी दोन वाजता तहसील कार्यालय परिसर घोषणांनी दणाणून गेला आणि नगरविकास आघाडीच्या एकजुटीचे प्रदर्शन जनतेसमोर दाखवण्याची ही संधी आघाडीने साधली.
नगरसेवक पदाच्या दहा प्रभागांमधील सर्व उमेदवारांनीही एकाच जल्लोषात उमेदवारी अर्ज दाखल करून प्रत्यक्ष रणशिंग फुंकले. प्रभाग क्र. १ मधून उमेदवार स्वप्नील मोहुर्ले आणि सौ. मंगला विरुटकर, प्रभाग क्र. २ मधून उमेदवार सिद्धार्थ पथाडे आणि मंगलाताई मोकळे, प्रभाग क्र. ३ मधून उमेदवार ईश्वर ऊर्फ गोलू ठाकरे आणि पोर्णिमा सोयाम ऊर्फ पोर्णिमा विजय खनके यांनी अर्ज दाखल केले. प्रभाग क्र. ४ मधून उमेदवार सय्यद जहीर सय्यद नसीम आणि सौ. नीता किशोर बानकर, प्रभाग क्र. ५ मधून उमेदवार भाऊजी कन्नाके आणि सय्यद फरिना शाकिर सय्यद, प्रभाग क्र. ६ मधून उमेदवार रमेश नळे आणि इंदुबाई निकोडे यांनीही नामांकन भरले. प्रभाग क्र. ७ मध्ये उमेदवार घनश्याम हिंगणे आणि पुणम गिरसावळे, प्रभाग क्र. ८ मध्ये उमेदवार दिलीप देरकर आणि वज्रमाला बतकमवार यांनी उमेदवारी दाखल केली. प्रभाग क्र. ९ मधून उमेदवार संध्या चंद्रशेखर चांदेकर, अनंता ताजने आणि अन्नु हरजीतसिंग संधू यांनी, तर प्रभाग क्र. १० मधून उमेदवार भारत रोहणे आणि गीता पथाडे यांनी आपले अर्ज सादर केले.
तत्पूर्वी या ऐतिहासिक दिवसाची सुरुवात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अरूण धोटे यांनी साईनगर वार्डमधील जगन्नाथ बाबा देवस्थान येथे दर्शन घेऊन केली. त्यानंतर भवानी माता मंदिर आणि नगरपरिषदजवळील संकटमोचन हनुमान मंदिर येथे सर्व उमेदवारांसह दर्शन घेत धार्मिकतेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
तहसील कार्यालय परिसर कार्यकर्त्यांच्या घोषणांनी अक्षरशः दणाणून गेला. शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विकास देवाळकर, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष ॲड. दीपक चटप यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला आणखी उर्जा मिळाली. युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा कुंदाताई जेनेकर, कार्यकर्ते सुरज ठाकरे, एजाज अहमद, धनराज चिंचोलकर, ॲड. रामभाऊ देवईकर, दिलीप देठे, कपिल इददे, मधुकर चिंचोलकर, गजानन पहानपटे, किशोर हिंगणे, किशोर ताजने, वैभव अडवे, मंगेश कोंडेकर, सय्यद जाकीर यांच्यासह मोठा जनसमुदाय यात सहभागी झाला. नगरविकास आघाडीने दाखल केलेल्या या नामांकनातून आघाडीची एकजूट, संघटनशक्ती आणि जनसमर्थनाचे प्रदर्शन स्पष्टपणे दिसून आल्याचे दिसून येत असल्याचे राजकीय निरीक्षक सांगत आहेत. आगामी निवडणुकीत नगरविकास आघाडी आपला प्रभाव पुन्हा सिद्ध करणार का? अशी जोरदार चर्चा राजुरा शहरात सुरू झाली आहे.
#RajuraElection #NagarvikasAaghadi #ArunDhote #CongressAlliance #FilingNomination #PoliticalUpdates #RajuraNews #LocalElections2025 #TeamUnity #PeoplePower #subhashdhote #advwamanraochatap #deepakchatap #shantanudhote #kundataijenekar #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha #Rajura-Municipal-Council-Elections2025



टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.