राजुरात 17 सप्टेंबरला मुक्तिदिन निमित्य गौरवाचा सोहळा
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. १३ सप्टेंबर २०२५) -
(Rajura Muktidin) राजुरा मुक्तिदिन उत्सव समिती व शहरातील विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने 17 सप्टेंबर 2025 रोजी भव्य मुक्तीदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात यावर्षी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करून राजुरा क्षेत्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या सात मान्यवरांना ‘राजुरा भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
यावर्षी राजुरा भूषण पुरस्काराचे मानकरी ठरलेले मान्यवर :
- डाॅ. रूपेश सोनडवले – राजुरा क्षेत्रातील पहिले सर्जन
- डाॅ. विशाल बोनगिरवार – एओन बंगलूरचे संशोधन व एशिया पॅसिफिक प्रमुख
- डाॅ. वर्षा कुळमेथे - पंधरे – आदिवासी समाजातील पहिली उच्च विद्याविभूषित डॉक्टर
- डाॅ. संकेत शेंडे – नाभिक समाजातील पहिले डॉक्टर
- ॲड. दिपक चटप – ब्रिटीश सरकारची शेवेनिंग शिष्यवृत्ती प्राप्त करणारे देशातील सर्वात तरुण वकील
- रोशन हावडा – सिंधी समाजातील पहिले चार्टर्ड अकाउंटंट
- शोएब शेख – क्विकलिफ आंतरराष्ट्रीय ॲम्बुलन्स कंपनीचे संस्थापक
या मान्यवरांच्या नावांची घोषणा मुक्तीदिन उत्सव समितीचे प्राचार्य दौलत भोंगळे, संयोजक अनिल बाळसराफ, सहसंयोजक मिलींद गड्डमवार, कार्यक्रम प्रमुख दिलीप सदावर्ते, समन्वयक प्रा.डाॅ. हेमचंद दुधगवळी, सहसमन्वयक कैलास उराडे, प्रा.विजय आकनुरवार, गणेश बेले, मिलिंद देशकर, अल्का सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेत केली.
राजुरा मुक्तिदिनाचे ऐतिहासिक महत्त्व
राजुरा हे क्षेत्र पूर्वी हैद्राबाद स्टेटच्या अखत्यारीत होते. निजामशाहीविरुद्ध झालेल्या मुक्तीसंग्राम लढ्यानंतर 1948 मध्ये राजुरा भारत देशात विलीन झाले. त्या ऐतिहासिक लढ्याचे औचित्य साधून मागील 17 वर्षांपासून राजुरा मुक्तीदिन उत्सव समिती शहरात मुक्तीसंग्राम सोहळ्याचे आयोजन करत आहे. या सोहळ्यात राजुरा क्षेत्राशी निगडीत मान्यवरांचा सन्मान करण्याची परंपरा सुरू आहे.
#RajuraMuktiDin #RajuraBhushan2025 #RajuraPride #InspiringRajura #RajuraHeroes #CelebratingExcellence #MuktiDinCelebration #advwamanraochatap #DrRupeshSondawale #DrVishalBongivar #DrVarshaKulmethe #drvarshapandhare #DrSanketShende #AdvDeepakChatap #RoshanHowrah #ShoaibSheikh #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
राजुरा क्षेत्रातील नामवंतांचा सत्कार अत्यंत गौरवाचा सोहळा आहे, यानिमियाने आपल्यातील नामवंतांचा परिचय सर्वदूर पोहोचविता येतो.
उत्तर द्याहटवा