राजुरात फुटलेला चेंबर दोन आठवड्यांपासून उघडाच
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ११ ऑगस्ट २०२५) -
सोमनाथपूर आठवडी बाजार परिसरातील रस्त्यावरील चेंबर दोन आठवड्यांपासून फुटून उघडे पडले असून, स्थानिक नागरिक व प्रवाशांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. हा चेंबर नागेश मडावी आणि सुधाकर टेकाम यांच्या घरा समोरील नाल्याच्या बाजूला असून, वॉर्ड क्रमांक १३ मधील महत्त्वाचा मार्ग असल्याने ये-जा करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.
![]() |
रविंद्र आत्राम जिल्हा कार्याध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद शाखा राजुरा |
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद शाखा राजुरा, जिल्हा चंद्रपूरचे युवा जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र आत्राम यांनी सांगितले की, या समस्येकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे. चेंबर दुरुस्त न झाल्याने मोटरसायकलस्वार, सायकलस्वार आणि पायी चालणारे नागरिक सतत धोक्यात आहेत. परिसरात रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशव्यवस्थेचा अभाव असल्याने ही समस्या अधिक गंभीर होत आहे.
रस्त्यावर उघडे पडलेले चेंबर केवळ अपघाताचे कारण ठरू शकते, एवढेच नव्हे तर पावसाळ्यात पाणी साचल्यास आजारपणाचाही धोका आहे. स्थानिकांनी अनेकदा तक्रार करूनही उपाययोजना झालेल्या नाहीत. रहिवाशांनी प्रशासनाकडे तातडीने चेंबर दुरुस्ती व रस्त्यावर प्रकाशव्यवस्था बसविण्याची मागणी केली आहे.
#Rajura #CivicNegligence #PublicSafety #RoadHazard #BrokenManhole #InfrastructureFailure #Chandrapur #UrbanIssues #RoadSafety #LightUpTheStreets #CitizensDemand #RavindraAtram #akhilbhartiyaaadiwasivikasparishad #rajuraupdate #aamchavidarbha #vidarbha #chandrapurupdate #chandrapurian #chandrapur
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.