Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भारतीय मजदूर संघाचा इतिहास उजळवणारा दिवस!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भारतीय मजदूर संघाचा इतिहास उजळवणारा दिवस! कामगार बांधवांनी रक्तदान करून दिला समाजसेवेचा संदेश आमचा विदर्भ - अनंता गोखरे  चंद्रपूर (दि. २८ जु...
भारतीय मजदूर संघाचा इतिहास उजळवणारा दिवस!
कामगार बांधवांनी रक्तदान करून दिला समाजसेवेचा संदेश
आमचा विदर्भ - अनंता गोखरे 
चंद्रपूर (दि. २८ जुलै २०२५) -
        भारतीय मजदूर संघाच्या स्वर्णिम ७० वर्षे अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तडाळी MIDC येथे भव्य रक्तदान शिबिर व कामगार संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमात संघटनेच्या ७० वर्षांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. या गौरवपूर्ण क्षणाचे स्वागत ५६ कामगारांनी रक्तदान करून केले. यावेळी जिल्हाध्यक्ष बंडू भाऊ हिरवे आणि जिल्हामंत्री पवन ढवळे हे देखील मंचावर उपस्थित होते. भारतीय मजदूर संघाच्या कार्यकर्त्यांनी संघटनेच्या इतिहासाचे स्मरण करून संघाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top