Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वृद्धाश्रमातील अन्नदानाने आ. मुनगंटीवार यांच्या सेवा उपक्रमांना सुरुवात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वृद्धाश्रमातील अन्नदानाने आ. मुनगंटीवार यांच्या सेवा उपक्रमांना सुरुवात ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन लोकसेवेचा प्रारंभ आमचा विदर्भ - दीपक शर्मा...
वृद्धाश्रमातील अन्नदानाने आ. मुनगंटीवार यांच्या सेवा उपक्रमांना सुरुवात
ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन लोकसेवेचा प्रारंभ
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
चंद्रपूर (दि. २८ जुलै २०२५) -
        माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आणि विद्यमान आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या ३० जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रमांची सुरुवात झाली. बल्लारपूर येथील ओबीसी आघाडीचे अध्यक्ष अमोल झाडे यांच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रम, विसापूर येथे अन्नदान व भेटवस्तू वाटप करून हा जनसेवेचा उपक्रम संपन्न झाला.

        यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जेष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले व भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. कार्यक्रमाला भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंग चंदेल, शहराध्यक्ष रणंजय सिंग, अध्यक्ष अमोल मोरे, अजय जयस्वाल, विद्याताई देवाळकर, किशोर पंदीलवार, सतीश कनकम, सरिता कनकम, देवा वाटकर, पिंटू देऊळकर, किशोर मोहूर्ले, जयश्री मोहूर्ले, संदीप पोडे यांची उपस्थिती होती. वाढदिवस साजरा करण्याची ही सेवाभावी परंपरा हे जनतेशी असलेलं नातं अधोरेखित करते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top