Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: "स्पर्धा परीक्षेचा मंत्र – अभ्यास, वेळ आणि आत्मविश्वास!"
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"स्पर्धा परीक्षेचा मंत्र – अभ्यास, वेळ आणि आत्मविश्वास!" महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात मार्गदर्शन सत्र यशस्वी आमचा विदर्भ - द...
"स्पर्धा परीक्षेचा मंत्र – अभ्यास, वेळ आणि आत्मविश्वास!"
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात मार्गदर्शन सत्र यशस्वी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
गडचांदूर (दि. २६ जुलै २०२५) -
       गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात 'स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन' या विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात ‘अभ्यास कौशल्य व वेळ व्यवस्थापन’ यावर विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे होते. विशेष मार्गदर्शक नरसिंग पाचाळ सर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास नियोजन, वेळ व्यवस्थापन, एकाग्रता आणि आत्मविश्वास या बाबत मोलाचे मार्गदर्शन केले. प्रा. प्रदीप परसुटकर आणि प्रा. आशिष देरकर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. संगीता पुरी आणि प्रा. चेतना येरणे यांनी केले. अकरावी व बारावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कार्यक्रम प्रेरणादायी ठरल्याची प्रतिक्रिया दिली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top