Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: "राजुरा न.प. शिक्षण परिषदेला यशाचा सन्मान!"
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"राजुरा न.प. शिक्षण परिषदेला यशाचा सन्मान!" विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाचा आदर्श उपक्रम आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २६ जुलै...
"राजुरा न.प. शिक्षण परिषदेला यशाचा सन्मान!"
विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाचा आदर्श उपक्रम
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २६ जुलै २०२५) -
       स्थानिक नगर परिषद शिक्षण विभाग केंद्राची पहिली शिक्षण परिषद आदर्श मराठी प्राथमिक विद्यालयात उत्साहात पार पडली. परिषदेस अध्यक्ष म्हणून केंद्रप्रमुख बंडू ताजने यांची उपस्थिती होती. त्यांनी “विद्यार्थी केंद्रित शिक्षणातून मानवी जीवनमूल्य जोपासली जावीत” असे मत व्यक्त केले.

        प्रमुख अतिथी म्हणून गोपिकाबाई सांगडा पाटील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका छाया मोहितकर, शिवाजी हायस्कूल चे मुख्याध्यापक गजानन खामनकर, सी.आर.जी. प्रतिनिधी सचिन वडेट्टीवार, बंडू बोढे, आदर्श हायस्कूल च्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर आणि राष्ट्रीय हरित सेना विभागप्रमुख बादल बेले उपस्थित होते.

        परिषदेमध्ये इंदिरा गांधी न.प. प्राथमिक शाळेच्या शिक्षिका निवेदिता पातुरकर यांनी शैक्षणिक साहित्याचा योग्य वापर आणि आदर्श मराठी प्राथमिक विद्यालयच्या प्राजक्ता साळवे यांनी मराठी विषयाचा आदर्श पाठ विद्यार्थ्यांसमोर सादर केला. सूत्रसंचालन रोशनी कांबळे, प्रास्ताविक नलिनी पिंगे, आभार ज्योती कल्लुरवार यांनी मानले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top