Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: "महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित झालेले चंद्रपूरचे सुपुत्र"
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित झालेले चंद्रपूरचे सुपुत्र" "डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांच्या कार्याला राष्ट्रीय गौरव"...
"महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित झालेले चंद्रपूरचे सुपुत्र"
"डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांच्या कार्याला राष्ट्रीय गौरव"
आमचा विदर्भ -अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. २३ जून २०२५) -
        शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञान देणारे माध्यम न राहता माणूस घडवणारी शक्ती असावी, असा विचार कृतीत उतरवणाऱ्या डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांचा 'महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2025' ने गौरव करण्यात आला आहे. हा पुरस्कार 'युनी ग्लोबल इंटेलेक्ट्युअल्स फाउंडेशन'तर्फे मुंबई येथील नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट माडेन हॉल येथे आयोजित ११व्या वार्षिक शिक्षण संमेलनात प्रदान करण्यात आला.

यहोवा यिरे फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांनी ‘शिका, कमवा आणि प्रगती करा’ या संकल्पनेवर कार्य करत हजारो युवकांना आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला आहे. शिक्षणाबरोबरच आरोग्य क्षेत्रातही संस्थेचे उल्लेखनीय योगदान आहे. या भव्य सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार व उद्योजकता मंत्री अँड. मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड. आशिष शेल्लार, राष्ट्रीय भाजपा प्रवक्ते प्रेम शुक्ला, IAS अधिकारी सौ. निधी चौधरी, डॉ. रचना भिमराजका, बिपीन गुप्ता व डॉ. सरिता गोम्स आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षण व उद्योग क्षेत्रातील २०० पेक्षा अधिक दिग्गजांनी या कार्यक्रमास हजेरी लावली.

        डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांनी आपल्या भाषणात म्हटले कि, "शिक्षण म्हणजे केवळ माहिती नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, त्यांना रोजगारक्षम करणं आणि सामाजिक जाणिवा विकसित करणं – हाच आमचा खरा उद्देश आहे." डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांनी २००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून दिली आहे. अनेकांना लघुउद्योगासाठी प्रशिक्षित केलं आहे, तर हजारो कुटुंबांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवल्या आहेत. या पुरस्कार सोहळ्यात डॉ. बोरकुटे यांच्यासह देशभरातून प्रेरणादायी काम करणाऱ्या अनेक शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी सन्मानित करण्यात आले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top