Accident ; स्कॉर्पिओची दुचाकी आणि खासगी बसला धडक
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, प्रतिनिधी
गडचांदूर (दि. २५ फेब्रुवारी २०२५) -
कोरपना-गडचांदूर रस्त्यावरील जोगी बार जवळ दुचाकी व खासगी बस ला स्कॉर्पिओच्या चालकाने जोरदार धडक दिली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा २३ फेब्रुवारी रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. सदर घटना 22 फेब्रुवारी रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता कोरपना तालुक्यातील नारंडा गावात राहणारे वसंत नामदेवराव बोढे (५५) हे त्यांच्या एमएच ३४ सीसी ४४३९ क्रमांकाच्या दुचाकीने गडचांदूरकडे जात होते. त्याचवेळी मागून येणारी स्कॉर्पिओ एमएच ३३ एसी ६६२५ क्रमांकाच्या चालकाने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्यांना गडचांदूर येथून जिल्हा शासकीय रुग्णालय चंद्रपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. दुचाकीला धडक दिल्यानंतर स्कॉर्पिओने खासगी बस क्र. एम एच ४० बी एल ३६६२ ला धडक दिल्याने नुकसान झाले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या वसंत बोडखे यांना शासकीय रुग्णालय गडचांदूर व नंतर जिल्हा रुग्णालयात चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले. जिथे २३ फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस हवालदार शीतल बोरकर यांच्या तक्रारी वरून गडचांदूर पोलिसांनी चंद्रशेखर नरेंद्र नैताम (२७,) रा. गोकुळ नगर वॉर्ड गडचिरोली याच्याविरुद्ध कलम २८१, १०६ (१), ३२४ (४) सह कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हवालदार ज्ञानेश्वर मडावी करत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.