विरूर स्टेशन येथील निलेशचा रेल्वे रुळावर सापडला मृतदेह; गावात शोककळा
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
विरूर स्टेशन (दि. ०७ डिसेंबर २०२४) -
गावातील 25 वर्षीय तरुण निलेश डवरे चे शव कब्रिस्तान जवळील (Central Railway Line) मध्य रेल्वे रुळावर आढळल्याने गावात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, निलेश डवरेच्या पालकांनी ही घटना अपघात नसून घातपात असल्याचा आरोप केला आहे. (wirur station) (Nilesh Dwarre)
शुक्रवारी सकाळी रेल्वे रुळाजवळ काही नागरिकांना मृतदेह दिसला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. निलेशच्या कुटुंबीयांच्या मते, तो 5 तारखेला गुरुवारी संध्याकाळी 9.00 दरम्यान मित्रा सोबत घरातून बाहेर पडला होता, परंतु रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. (Police Station Wirur)
निलेशच्या वडिलांनी सांगितले की, माझा मुलगा अपघाताने मरण पावला नाही. त्याचा खून झाला आहे. त्याच्यावर कोणत्यातरी कारणाने हल्ला करण्यात आला आहे. कुटुंबीयांनी निलेशच्या मृत्यूविषयी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या घटनेची प्राथमिक नोंद केली असून, अपघात, आत्महत्या किंवा घातपात (Accident, suicide, casualty) यामधील कोणता प्रकार आहे, याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, मृतदेहावरील जखमांचे निरीक्षण, साक्षीदारांचे निवेदन आणि (CCTV footage) सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे प्रकरणाचा तपास करण्यात येईल. (Observation of wounds on corpses)
निलेश डवरे च्या अकाली मृत्यूमुळे गावकऱ्यांमध्ये (Mourning spread) शोककळा पसरली आहे. (An unfortunate incident) सर्वत्र या दुर्दैवी घटनेबाबत चर्चा होत आहे. काही ग्रामस्थांनी पोलिसांनी अधिक तत्परतेने तपास करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी केली आहे. निलेश हा एक हुशार आणि मेहनती मुलगा म्हणून गावात परिचित होता. तो कुटुंबासाठी आर्थिक आधार बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून होता. गावकऱ्यांसाठी ही घटना केवळ दुःखद नाही, तर शंकेचे सावट निर्माण करणारी आहे. तपासानंतरच या घटनेमागील सत्य समोर येणार आहे.
#wirurstation #NileshDaware #NileshDavare #CentralRailwayLine #Death #PoliceStationWirur #Accident #suicide #casualty #CCTVfootage #Observationofwoundsoncorpses #Mourningspread #Anunfortunateincident
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.