Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: संतप्त नागरिकांनी लावले गोवरी ग्रामपंचायतला कुलूप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
संतप्त नागरिकांनी लावले गोवरी ग्रामपंचायतला कुलूप संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी साधला माजी जिप सभापती सुनिल उरकुडे यांचेशी संपर्क आमचा विदर्भ - ...
संतप्त नागरिकांनी लावले गोवरी ग्रामपंचायतला कुलूप
संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी साधला माजी जिप सभापती सुनिल उरकुडे यांचेशी संपर्क
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०१ डिसेंबर २०२४) -
        तालुक्यातील गोवरी गावातील नागरिकांच्या समस्या मार्गी लागत नसल्याने संतप्त नागरिकांनी ग्राम विकास अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराला त्रासून ग्राम पंचायतीला कुलूप लावले. सदर माहिती राजुरा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे यांना मिळताच त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील उरकुडे यांच्याशी बोलून दोन दिवसात ग्राम पंचायतीला भेट देऊन समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर कुलूप काढण्यात आले. (Gowri Gram Panchayat was locked by angry citizens)

        मागील दोन तीन वर्षापासून ग्राम पंचायत गावातील समस्या निकाली काढत नसल्याने व नवीन नवीन नियम दाखवून कामापासून पळवाटा शोधत असलेला ग्राम विकास अधिकारी घुमे यांच्यावर कारवाही करण्याची मागणी नागरिक करीत आहे. ग्राम विकास अधिकारी घुमे फक्त कर्मचाऱ्यांचे पगार काढण्यासाठीच ग्राम पंचायत मध्ये येत असतात त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांनी गोवरी ग्राम पंचायतीला न ठेवता बदली करण्याची मागणी करीत ग्रामपंचायत भवनाल कुलूप लावले. घटनेची माहिती मिळताच संवर्ग विकास अधिकारी राजुरा हेमंत भिंगारदेवे यांनी माजी सभापती सुनिल उरकुडे यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क करून घटनेची सविस्तर माहिती घेत मला दोन दिवसाची मुदत द्या मी स्वतः येऊन सर्व समस्यांवर चर्चा करून समस्या मार्गी लावतो अशी ग्वाही नागरिकांना दिली. सुनील उरकुडे यांनी वातावरण शांत करीत नागरिकांशी संवाद साधून कुलूप काढण्यास संगितले. नागरिकांनी सुनील उरकडे यांच्यावर विश्वास ठेवीत आंदोलन मागे घेतले. याप्रसंगी हरीचंद्र जूनघरी, भास्कर इटणकर, अविनाश उरकुडे, अशोक भगत, गणपत लांडे, प्रकाश काळे, पौर्णिमा उरकुडे, पुष्पा पेद्दपल्लिवर, विमल येसन्सुरे सह मोठ्या संख्येने महिला पुरुष युवकांची उपस्थिती होती. (Cadre Development Officers made contact with former JIP Chairman Sunil Urkude)

#aamchavidarbha #vidarbha #rajura #chandrapur #gouri #GouriGramPanchayat #PanchayatSamitiRajura#Gramsevak #BlockDevelopmentOfficer #BDO #FormerChairman #ZillaParishadChandrapur #SunilUrkude

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top