जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ३० नोव्हेंबर २०२४) -
नुकतीच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडली. या निवडणुकीचे परिणामही आले आहेत. मात्र या निवडणुकीचे परिणाम बघता ईव्हीएम बद्दल सामान्य जनतेच्या मनात कुठेतरी दाट शंका निर्माण झाली आहे. महाराष्ट्र असो कि चंद्रपूर जिल्हा निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता असणे आवश्यक आहे. संभावित राजुरा नगर परिषदेची निवडणूक लवकरच घेण्याचे संकेत प्रसारमाध्यमांमार्फत मिळत आहे. ईव्हीएम बद्दल सामान्य जनतेच्या मनात आलेली शंका बघता शासनाने राजुरा नगर परिषदेची निवडणूक ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर ने घ्यावी अशी मागणी ब्लॅक पँथर फ्रेंड्स ग्रुप असोसिएशन ने केली आहे. या आशयाचे एक निवेदन चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला आपल्या स्तरावरून पत्रव्यवहार करावा अशी मागणी करण्यात आली आहे. (Take Rajura Nagar Parishad Elections by Ballot Paper - Vijay Channe)
येणारी राजुरा नगर परिषदेची निवडणूक बॅलेट पेपरवर न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार घालू व शिक्षित तरुण व तरुण रस्त्यावर उतरून आंदोलन करत सामूहिक बेमुदत उपोषण सुरू करू असा इशारा ब्लॅक पँथर फ्रेंड्स ग्रुप असोसिएशनचे अध्यक्ष विजय चन्ने यांनी दिला आहे. (Demand of Black Panther Friends Group Association)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.