विषबाधित मुलांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे सुरू आहे उपचार
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०८ डिसेंबर २०२४) -
सावली तालुक्यातील पारडी येथील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्यानंतर त्या मुलांचे उपचार सुरू करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूरमध्ये नेण्यात आले आहे. यासंबंधी डॉ. मंगेश गुलवाडे यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर जाऊन या मुलांची भेट घेतली. या भेटीद्वारे त्यांनी मुलांच्या आरोग्याची सविस्तर माहिती घेत पालकांशीही संवाद साधला. या मुलांच्या आरोग्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली.
माणसाच्या आरोग्यासाठी अन्नाची गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची असते, आणि विषबाधा झालेल्या मुलांच्या आरोग्याच्या स्थितीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. मंत्रिमंडळातील सदस्य मा. सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार ही भेट घेण्यात आली, जेणेकरून संबंधित उपचारांचा आढावा घेता येईल आणि आवश्यक ते पाऊले उचलता येतील.
जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूरचे (District Surgeon) जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी या मुलांवर आवश्यक ती उपचार प्रक्रिया सुरू केली आहे. (Doctors) डॉक्टरांनी त्यांची स्थिती स्थिर असल्याची माहिती दिली असून त्यांच्या आरोग्य सुधारासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. यावेळी मा.सुधीर मुनगंटीवार यांच्या सामाजिक भानाची भावना आणि त्यांनी केलेले मार्गदर्शन हे प्रेरणादायी ठरले आहे. प्रशासन आणि वैद्यकीय विभाग मिळून या परिस्थितीवर योग्य नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
यावेळी महायुतीचे डॉ.मंगेश गुलवाडे, (Shiv Sena Jilha Pramukh Bandu Hazare) शिवसेना जिल्हाप्रमुख बंडू हजारे, नितीन भटारकर, प्रकाश देवतळे, जयप्रकाश कांबळे, छबूताई वैरागडे, किरण बुटले, मनोज पाल, रुद्रनारायण तिवारी, धनराज कोवे, उमेश आष्टणकर, राकेश बोमनवार, रामकुमार आकापल्लीवार हे शिष्टमंडळ उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.