अनोखा सत्कार पाहुन आ. जोरगेवार भारावले, फळांचे रुग्णालयात वाटप
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 13 डिसेंबर 2024) -
आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार किशोर जोरगेवार (Newly elected MLA Kishore Jorgewar of Chandrapur Assembly Constituency) यांचा चंद्रपूरमधील फळ विक्रेते आणि जिल्हा फुटपात दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी
(Fruit Vendors and District Footpath Shopkeepers Association) कार्यालयात भेट घेत अनोख्या पद्धतीने सत्कार केला. फुलांच्या पारंपरिक गुलदस्त्यांऐवजी ताज्या फळांनी भरलेल्या टोपल्या देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या अभिनव आणि आगळ्या स्वागताबद्दल आमदार जोरगेवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
माणूस पैश्याने नाही तर मनाने श्रीमंत असतो याचे जिवंत उदाहरण आज एकदा अनुभवयास मिळाले फळ विक्रेत्यांनी आपल्या मेहनतीचे प्रतीक म्हणून एक नव्हे तर डजनभर टोपलीभर ताजी फळे देत आमदार किशोर जोरगेवार यांना आमदारगीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी फळ विक्रेत्यांनी सांगितले की, “आमदार जोरगेवार यांनी नेहमीच चंद्रपूरच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी काम केले आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली आमच्यासारख्या छोट्या व्यावसायिकांना नेहमीच प्रोत्साहन आणि आधार मिळाला आहे. त्यांचे आमदार होणे आम्हाला आनंददायक आहे, आणि या अनोख्या पद्धतीने आम्ही त्यांचे अभिनंदन केले आहे.
सत्कार स्वीकारतांना आमदार जोरगेवार म्हणाले, “हा सत्कार केवळ माझ्यासाठी नव्हे, तर समाजात सामजिक कार्यासाठी प्रेरणा देणारा आहे. फळ विक्रेत्यांच्या या अनोख्या कल्पनेमुळे मला खूप अभिमान वाटतो. त्यांनी दाखवलेली आत्मीयता आणि सन्मान खूप महत्त्वाचा आहे. फळ विक्रेत्यांनी दिलेली फळे लगेचच चंद्रपूर शहरातील रुग्णालयामध्ये वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना ही फळे वाटण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.