@राजुरा विधानसभा क्षेत्र ७०
गडचांदूर (दि. ०६ नोव्हेंबर २०२४) -
निवडणूक प्रचाराच्या धामधुमीला सुरुवात झाली असून अफाट पैसे असलेले उमेदवार वारेमाप खर्च करत आहे. प्रस्थापित नेत्यांनी त्यांच्या कार्यकाळात जनसामान्यांची कामे केली असती तर वारेमाप पैसे लावायची वेळ आली नसती. सत्ता मिळाल्यावर सत्तेचा माज अंगात आणून प्रस्थापित नेते व कार्यकर्ते हुकूमशहा प्रमाणे वागत होते व वागतही आहे. परिणामी शेतकरी, शेतमजूर, असंगठित क्षेत्रातील कामगार, महिला वर्ग हे प्रस्थापित नेते व त्यांच्या पक्षापासून दुरावले असून या प्रस्थापित नेत्यांनी तळागाळातील लोकांची एक तरी कामे केली असती तर विना प्रचारानेच हे लोक निवडून आले असते.
उमेदवारीवरून भाजप मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने आता भाजप नेत्यांनी कितीही डोके आटप केले तरी निवडणुकीत त्याचा फायदा होणार नाही आहे. तीच परिस्थिती काँग्रेसची असून लहान भाऊ ला आमदारकी लढायची इच्छा होती मात्र सत्ता लोलुपता हि कधी सुटायची नसते या उक्तीप्रमाणे लहान भाऊ रुसल्यासारखे वागत असल्याचे दिसून येत आहे. महिलां व मुलींसोबत विधानसभा क्षेत्रात अत्याचार व त्यांना पाठबळ हि बाब जगजाहीर असून सत्तेचा माज अंगात आणलेले काँग्रेसचे काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उर्मट वागण्याने महिला, मुली तसेच सर्वसाधारण वर्ग काँग्रेसने दुरावला असून काँग्रेस या निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर जाणार असल्याचे भाकीत वर्तविण्यात येत आहे. शेतकरी संघटनेला खाली खेचण्याचे काम काँग्रेस भाजप करीत असून संघटनेत नवीन पिढीतील लोक नसल्याने हि निवडणूक त्यांना कठीण ठरणार आहे.
संभाजी ब्रिगेड पक्षाचे उमेदवार तसेच सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी मागील तीन वर्षांत राजुरा विधानसभा क्षेत्र पिंजून काढला आहे. क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर, असंगठित क्षेत्रातील महिला व पुरुष कामगार यांचे शेकडो कामे करून दिली आहेत. त्यांच्या याच कामाने प्रभावित होत रोखठोक प्रहार कामगार संघटनेने संभाजी ब्रिगेड पक्षाचे उमेदवार तसेच सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे याना जाहीर पाठिंबा दिला आहे. रोखठोक प्रहार कामगार संघटनेने भूषण फुसे याना समर्थन देणाऱ्या पत्रात नमूद केले आहे कि, दिव्यांगां आणि कामगारांकरिता हि संघटना समाजकारण, राजकारण करणारी संघटना आहे. भूषण फुसे यांचे सामाजिक व राजकीय कार्य पाहता राजुरा विधानसभा २०२४ ची निवडणूक आपण जिंकण्याचे प्रबळ दावेदार असून भविष्यात राजुरा मतदार संघातील कामगारांचे, कष्टकऱ्यांचे, दिव्यांगांचे, निराधार शेतकऱ्यांचे तसेच शिक्षणाचे खाजगीकरण, महाग होत चाललेला उपचार, आरोग्य, सीमावर्ती भागात वाढते जुंव्यांचे अड्डे, वाढती गुन्हेगारी, गोळीबार, प्रदूषण व भ्रष्ट्राचार यावर योग्य भूमिका विधानसभेत मांडून राजुरा मतदारसंघातील जनतेला न्याय मिळवून द्याल या आशेने समर्थन पत्र देत पाठिंबा दिला आहे. या आशयाचे पत्र रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश हजारे व कोरपना तालुकाप्रमुख अफरोज अली सय्यद यांनी दिले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.