Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ''असे लाभले आम्हास, आतापर्यंत जनप्रतिनिधी'' - गावकरी म्हणे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरपना तालुक्यातील अंतरंगाव येथील नागरिकांनी असं काय म्हटलं? सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी ठेवले कपाळावर हाथ बघा व्हिडीओ  कोरपना (दि. १...

कोरपना तालुक्यातील अंतरंगाव येथील नागरिकांनी असं काय म्हटलं?
सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी ठेवले कपाळावर हाथ
बघा व्हिडीओ 
कोरपना (दि. १४ ऑकटोबर २०२४) -
        राजुरा विधानसभा क्षेत्रात सिमेंट, कोळसा उद्योगामुळे खनिज निधी उपलब्ध होतो. वास्तविक पाहता या खनिज निधीतून सर्वात अगोदर कोणते काम व्हायला पाहिजे होते तर ते होते शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्याकरिता पांदण रस्त्याचे. गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा गावची भंगता अवदशा, येईल देशा।। ग्रामगीतेच्या ह्या म्हणी प्रमाणे कार्य झाले असते तर जगाचा पोशिंदा परिसरातील शेतकरी हा सुखी झाला असता. सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे हे कोरपना तालुक्यातील अंतरंगाव येथे आले असता पांदण रस्त्याचा समस्येबद्दल गावकरी व शेतकऱ्यांनी व्यथा मांडली तेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराने प्रेरीत एका शेतकऱ्याने म्हटले ''असे लाभेल आम्हास आतापर्यंत जनप्रतिनिधी, येता निवडणुकीच्या वेळेस दारी'' हे एकूण सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी कपाळावर हाथ ठेवले. नंतर भूषण फुसे यांनी ''ह्या वेळेस प्रस्थापितांना धडा शिकवावा मज सारख्या नव्या तरुण तडफदार उमेदवारांना निवडून द्यावा'' म्हणताच गावकऱ्यांना हसू आवरेनासे झाले. 

गाव हा देशाचा चेहरा असतो, राज्यघटनेनेही ग्राम पंचायतीला विशेष महत्व दिले आहे. कोरपना तालुक्यातील अंतरंगाव येथील नागरिकांनी भूषण फुसे याना शेतात जाणाऱ्या पांदण रस्त्याची माहिती दिली. पावसाळ्यात या पांदण रस्त्याने जाणे येणे कठीण झाले असून शेकडो शेतकरी दररोज या त्रासदायक पांदण रस्त्याने जाणेयेणे करावे लागत आहे. २०२३ च्या पुरबुडीच्या वेळेसचे अनुदानाची रक्कमही देण्यात आली नसून तारीख पार तारीख मिळत असल्याचे निदर्शनास आणून दिले. गावकऱ्यांनी सांगितले कि, गावालगत असलेल्या वेकोलि खाणीच्या नियोजनशून्य भोंगळ कारभारामुळे नदीचा प्रवाह गावाकडे वळल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात संपूर्ण गाव बुडून जात आहे. गावाला एकच मुख्य रस्त्या आहे आणि तो रस्ता ही पावसाळ्यात पाण्याखाली बुडाल्याने गावकऱ्यांचा तालुक्याशी व इतर गावांशी संपर्क तुटतो. गावकऱ्यांची अशी मागणी आहे की त्यांना पर्यायी रस्ता करून द्यावे जेणेकरून पावसाळ्यात त्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार नाही. तसेच गावातील समस्यांचे कथन केले. यावेळी शेकडो गावकरी व महिला उपस्थित होत्या.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #Socialworker #BhushanPhuse #BhushanFuse #BhushanMadhukarraoFuse #kukudsath #pandharpouni #Talodhi #Bakhardi #GadchandurBhoyegaonMarga #ForestDepartment #Antargaon #Election #RajuraAssemblyConstituency2024

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top