Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शिवसेना जिल्हा महिला आघाडी प्रमुख मिनलताई आत्राम यांनी घेतली ''कुटुंब भेट''
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मिनलताई बल्लारपूर तालुक्यातील कवडजई हेटी येथे महिलांचा भेटीला मुख्यमंत्री लाडकी बहीण ''कुटुंब भेट अभियान'' आमचा विदर्भ - दीप...

मिनलताई बल्लारपूर तालुक्यातील कवडजई हेटी येथे महिलांचा भेटीला
मुख्यमंत्री लाडकी बहीण ''कुटुंब भेट अभियान''
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०७ ऑकटोबर २०२४) -
        राज्य सरकारच्या योजनांची माहिती घरोघरी पोहोचवण्यासाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट' (Mukhyamantri Ladaki Bahin Yojna) योजना अंमलात आणली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अभियानात शिवसैनिक दररोज बहीण योजनेचा ज्यांना लाभ झाला आहे, 
''कुटुंब भेट अभियान'' (Kutumb Bhet Abhiyan) अंतर्गत त्या कुटुंबांना आणि ज्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचली नाही अशा कुटुंबांचीदेखील भेट घेऊन त्यांना योजनेत सामावून घेण्याचे प्रयत्न करण्याचे आदेश शिवसैनिकांना मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी शिवसैनिकांना (Shiv Sainik) दिले आहे. यासाठी एक ॲप तयार करण्यात आले असून या अभियानात कार्यकर्त्याच्या मोबाईलमध्ये विशेष ॲप समावेश असणार आहे, या ॲपमध्ये जिओ ट्रॅकिंग, कार्यकर्त्याने केलेला संपर्क, वेळ समजणार आहे, गरज पडल्यास या ॲपमधून लाडकी बहिण योजनेबाबत अर्ज भरला जाणार असून लाडकी बहिण योजनेबाबत महिलांकडून प्रतिक्रिया (Reactions from women) जाणून घेणार आहे. 

        मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाच्या माध्यमातून ''कुटुंब भेट अभियान'' अंतर्गत बल्लारपूर तालुक्यातील (Ballarpur Taluka) कवडजई हेटी या गावात शिवसेना जिल्हा महिला आघाडी प्रमुख मिनलताई आत्राम, शिवसेना बल्लारपूर विधानसभा संघटिका क्रिष्णा सुरमवार, भद्रावती तालुका प्रमुख योगीता घोरुडे, उपतालुकाप्रमुख राधाबाई कोल्हे यांनी प्रत्येक कुटुंबाला भेट देवुन शासनाच्या विविध योजना ची माहिती दिल. तसेच केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिल्या बद्दल केंद्र सरकार व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.

        विशेष म्हणजे, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' राबवत असताना 'लेक लाडकी', 'लखपती योजना', 'मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना', 'मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना', 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना', 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना', 'मुख्यमंत्री वयोश्री योजना', 'कामगार कल्याण योजना', 'मुख्यमंत्री कृषी पंप योजना', 'महिला बचत गटासाठी विविध योजना' अशा प्रामुख्याने 10 योजना संदर्भात शिवसनिनिकांकडून माहिती देण्यात येणार असल्याचे शिवसेना जिल्हा महिला आघाडी प्रमुख मिनलताई आत्राम यांनी सांगितले. या भेटी दरम्यान या सगळ्या योजनांची कुटुंबांना माहिती दिली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेमुळं या इतर योजनांवर त्याचा काही परिणाम झाला नाही हे त्यात स्पष्टपणं जनतेला सांगण्यात येत आहे.

#LakeLadaki #LakhpatiYojna #MukhyamantriAnnapurnaYojna #FreeHigherEducationSchemeforGirls #ChiefMinisterYouthWorkTrainingScheme #ChiefMinisterTirthaDarshanYojana #MukhyamantriVyoshreeYojana #WorkerWelfareScheme #ChiefMinisterAgriculturePumpYojana #Variousschemesforwomenself-helpgroups #ChiefMinister #EknathShinde #MinaltaiAtram

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top