Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजुऱ्यात माजी आमदार सुदर्शन निमकरची रॅली ठरली लक्षवेधी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - अनंता गोखरे राजुरा (दि. ०६ सप्टेंबर २०२४) -         भाजपचे नेते तथा माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या वाढदिवसा निमित्त अयोजन सम...

आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. ०६ सप्टेंबर २०२४) -
        भाजपचे नेते तथा माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या वाढदिवसा निमित्त अयोजन समितीने शेतकरी व महिला मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला जनतेनी हजारोच्या संख्येनी उपस्थित राहून उस्फुर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या निमित्ताने भवानी मंदिरात आरती करून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीचे एक टोक नाका नंबर ३ वर होते तर दुसरे टोक नेहरू चौकात होते, विशेष म्हणजे, सध्या शेतीचा  हंगाम सुरू आहे. अशा कामाच्या दिवसात शेतकरी व महिलांची उपस्थिती लक्षवेधी होती.

        या मेळाव्याचे उद्घाटन तेलंगणा राज्यातील शिरपुरचे आमदार डॉ. पालवाई हरिशबाबु यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अँड. संजय धोटे व प्रमुख अतिथी म्हणून राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार किशोर जोरगेवार, बंजारा समाजाचे दिशागुरू कर्मयोगी संत प्रेमसिंग महाराज, भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, गडचिरोली जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवर, महिला मोर्चा प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम, प्रदेश महिला मोर्चाच्या विद्या देवाळकर, राजगोंडवणा गड संरक्षण समिती राय सेंटरचे संस्थापक किसनराव कोटनाके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, आरपीआय चे विदर्भ उपाध्यक्ष सिध्दार्थ पथाडे, बाजार समितीचे माजी सभापती सय्यद आबिद अली व अमर बोडलावर, किशोर बावणे, हरिदास झाडे, अमोल आसेकर, कृऊबास उपसभापती संजय पावडे, विजय रणदिवे, गणेश झाडे, राजेश राठोड, कोमल फरकडे, गौरी सोनेकर, वंदना गौरकर, सुमन शेळके, वर्षा लांडगे आदी मान्यवर मंचावर विराजमान होते. यावेळी शेतकरी नेते पाशा पटेल यांनी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड काळाची गरज असल्याचे म्हंटले. हवेतील कार्बनडाय ऑक्साईड चे प्रमाण वाढत असल्याने त्याचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम पडत आहे. या शेत्रातील जमीन बांबू शेतीसाठी पूरक असल्याने या शेतीतून महिला समृध्द होऊ शकते असे सांगितले. याप्रसंगी आत्राम यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.   

        सत्काराला उत्तर देताना माजी आमदार निमकर हे जनतेची उपस्थिती पाहून चांगलेच भारावून गेले. सध्या शेतीचे काम सुरू असताना जनतेनी दाखवलेले प्रेम व आपुलकी याबद्दल ऋणी असल्याचे सांगत भविष्यात सुध्दा अशीच साथ देण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक आयोजन समितीचे अध्यक्ष केशवराव ठाकरे यांनी केले व संचालन प्रदीप बोबडे व प्रद्या नागपुरे यांनी केले. आभार श्रीकृष्ण गोरे यांनी मानले. या मेळाव्याला कोरपना, गोंडपिपरी, जिवती व राजुरा तालुक्यातून जनता मोठ्या संख्येने आली होती. तसेच जिवती या दुर्गम भागातून देखील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #korpana #sudarshannimkar #birthday #5thsaptember #AdvSanjayDhote #HarishSharma #DeoravBhongale #pashapatel #Farmers #womensmeeting #program #Rally

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top