आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २५ सप्टेंबर २०२४) -
स्थानिक मूक बधीर विद्यालय येथे एका दिव्यांग विद्यार्थिनीचे लैगिक शोषण झाल्याचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणात पोलीस प्रशासन यांचेकडून योग्य चौकशी झाली नाही. जिल्हा परिषदेकडून आरोपी संस्था व आरोपी कर्मचारी यांची पाठराखण केली जात आहे. सदर प्रकरण एप्रिल महिन्यात उघडकीस आले. त्यानंतर जिल्हा परिषद कडून चौकशी समिती गठीत करून १४ जून ला अहवाल बनला मग लगेचच त्या अहवालाच्या आधारे शाळेची मान्यता रद्द ह्वायला हवी होती पण तसे झाले नाही. तर त्या उलट नवीन सत्र सुरु झाले विद्यार्थी वसतिगृहात दाखल झाले दोन महिने शिक्षण घेतल्यानंतर ३० ऑगस्ट ला शाळेची मान्यता रद्द झाली. चालू सत्राच्या माधातुनच शाळा बंद झाल्याने दिव्यांग विद्यार्थी शिक्षणापासून वंचित झाले. दोन महिन्यापासून मुलींसाठी शाळेत प्रवेश बंद केला होता, त्यामुळे दिव्यांग मुलींचे शैक्षणिक नुकसान झाले. शाळेवर त्वरित प्रशासक बसने अपेक्षित होते, पण तसे झाले नाही. या प्रकरणात वारंवार प्रशासनाला पत्रव्यवहार केला पण जिल्हा परिषदेकडून व समाज कल्याण विभागाकडून काहीच उत्तर दिले नाही. उलट आरोपीनांच पाठीशी घालण्याचे काम केले गेले. त्यामुळे प्रशासनाला जाग यावी व बदलापूर सारखे प्रकरण पुन्हा घडू नये यासाठी अनुपम बहुउद्देशीय सामाजिक संस्था व जिल्ह्यातील सर्व दिव्यांग नागरिक व दिव्यांग मुलांचे पालक मिळून जिल्हा परिषद चंद्रपूर येथे एक दिवसाचे धरणे आंदोलन करीत आहोत.
आंदोलनाच्या प्रमुख मागण्या -
- दिव्यांग विद्यार्थिनीच्या यौन शोषण प्रकरणाची SIT चौकशी झालीच पाहिजे.
- शाळेवर त्वरित प्रशासकाची नेमणूक करावी.
- सर्व आरोपी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करावे.
- समाज कल्याण अधिकारी व मुख्याध्यापिका यांचेवर गुन्हा दाखल करवा व त्वरित निलंबन करावे.
- संस्थेची नोंदणी रद्द करावी.
आंदोलनात तरुण, महिला व नागरिक व सर्व अधिकारी व कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अनुपम बहुउद्देशीय संस्था व रासप जिल्हाध्यक्ष रमाकांत यादव यांनी केले आहे.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #Atrocitiesofdisabledstudents #Sexualexploitation #ZillaParishad #DepartmentofSocialWelfare #Inquirycommitteeconstituted #Hostel #RamakantYadav #AnipamBahuuddeshiyaSamajikSanstha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.