Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजुरावासियांना आली शेवटी डॉ. कुळमेथे दाम्पत्यांची आठवण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य अधीक्षकांची बदली करा भाजपा कामगार जिल्हा उपाध्यक्ष महादेव तपासे यांची मागणी आमचा विदर्भ - दीपक शर्मा राज...

राजुरा उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य अधीक्षकांची बदली करा
भाजपा कामगार जिल्हा उपाध्यक्ष महादेव तपासे यांची मागणी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०९ ऑगस्ट २०२४) -
        भाजपा कामगार मोर्चा तालुका राजुरा तर्फे जिल्हा शल्य चिकित्सक यांची भेट घेऊन शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले. राजुरा उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील आरोग्य अधीक्षक डॉ. मुणेश्वर भोंगाळे यांची प्रभारी तत्वावर नियुक्ती झालेली आहे. परंतु राजुरा उपजिल्हा रुग्णालय येथे नियमित गैरहजर राहत असून त्यांचे वास्तव्य भंडारा येथे आहे. राजुरा उपजिल्हा येथे रुजू झाल्यापासून ते सुट्या वर गेले आणि अजून पर्यंत आले नाही. त्यामुळे सामान्य रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना उपचाराचा आभाव व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. वरिष्ठांचे वचकच नसल्याने रुग्णालयातील कर्मचारी रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांना उद्धट वागणूक देत आहे. त्यामुळे अनेकांची हाल अपेष्टा होत असून अनेक रुग्णांना उपचाराभावी रेफर टू चंद्रपूर केले जात असून बऱ्याच जणांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लवकरात लवकर नियमित आरोग्य अधिक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव तपासे यांनी निवेदनाद्वारे शिष्टमंडळा सोबत केली आहे. निवेदन देतांना माजी किसान आघाडीचे जिल्हा अध्यक्ष राजू घरोटे, जनार्धन निकोडे, संजय जयपुरकर, राजू गैरशेट्टीवार उपस्थित होते.

राजुरावासियांना आली शेवटी डॉ. कुळमेथे दाम्पत्यांची आठवण
        राजुरा उपजिल्हा रुग्णालयात गत १८ वर्षे डॉ. कुळमेथे दाम्पत्य रुग्णांची सेवा देत होते. त्यांच्याही काळात क्रिटिकल पेशंट आल्यास तज्ञ डॉक्टर व जिल्हास्तरीय साहित्य उपलब्ध नसल्याने रेफर टू चंद्रपूर होतच मात्र डॉ. कुळमेथे दाम्पत्य हे सर्वसामान्य तळागाळातील रुग्णांना शक्यतो सेवा देत होते. कोरोना काळातही त्यांचे अतुल्य योगदान होते. उपजिल्हा रुग्णालयाच्या मागेच देशपांडे वाडीत ते राहत असल्याने रात्री १० नंतरही ते अचानक रुग्णालयात पोहचायचे त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये त्यांचे वचक होते. त्यांची पत्नी डॉ. अनिता अरके यांच्या काळात महिलांच्या प्रसुतीही मोठ्या प्रमाणात होत होत्या मात्र आता सर्वसामान्य तळागाळातील महिलांना सुद्धा प्रसूतीकरिता खाजगी प्रसूतिगृहात पाठवीत असल्याची चर्चा आहे. अधीक्षकच नसल्याने एरवी नवीन आलेले डॉक्टरही स्वतःचे क्लिनिक खोलून अधिक वेळ तिथेच देत असल्याची चर्चा सुद्धा सुरु आहे. राजुरा उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य अधीक्षकांची बदली करून परत डॉ. कुळमेथे दाम्पत्यांनाच येथे रुजू करा अशी मागणीही सर्वसामान्य तळागाळातील लोकांनी केली आहे. 

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #RajuraUpazilaHospital #SuperintendentofHealth #patient #hospital #doctors #childbirth #Privatematernityhospital #governmentmaternityhospital #RefertoChandrapur #drlahukulmethe 
09 Aug 2024

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top