चंद्रपूर (दि. ६ जुलै २०२४) -
लोकनेते विकासपुरुष ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर तालुक्यातील वढा या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मंजूर 25 कोटी रू किमतीच्या आराखड्याशी संबंधित विकासकामांना तातडीने सुरुवात करावी अशी मागणी भाजपा नेते ब्रिजभूषण पाझारे यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे. या मागणी संदर्भात ब्रिजभूषण पाझारे यांनी दि. 2 जुलै रोजी एका शिष्टमंडळासह निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांची भेट घेत विस्तृत चर्चा केली.
यावेळी बोलताना ब्रिजभूषण पाझारे म्हणाले, नियोजन विभागाच्या दि. 14 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार श्री क्षेत्र वढा येथील 25 कोटी रू किमतीच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. वढा हे तीर्थक्षेत्र चंद्रपूर जिल्ह्यातील भाविकांचे श्रध्दास्थान आहे, धार्मिक मानबिंदू आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी या परिसरातील नागरिक, भाविक तसेच आम्हा लोकप्रतिनिधीच्या मागणीच्या अनुषंगाने प्रयत्नपूर्वक या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 25 कोटी रू. निधी मंजूर करविला आहे.
या निधीतून अपेक्षित तीर्थक्षेत्र विकास कामांना तातडीने सुरुवात होणे गरजेचे आहे. याबाबत त्वरित संबंधितांना योग्य कार्यवाहीसाठी निर्देश द्यावे अशी मागणी ब्रिजभूषण पाझारे यांनी यावेळी केली.या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला अंदाजपत्रके तयार करण्याचे निर्देश द्यावे व संबधित कामाला गती द्यावी अशी सूचना पाझारे यांनी केली. या संदर्भात सर्व संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेऊन कामांना गती दिली जाईल असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी दिले. शिष्टमंडळात शंकर वरारकर, बंडू पुरडकर, महेंद्र वडस्कर, संदीप भोसकर बंडू गोहोकार रवि चहारे यांची उपस्थिती होती.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #sudhirmungantiwar #BrijbhushanPazare #wadhatirthkshetra #BJPleader #DeputyCollector #delegation #Governmentdecision #PlanningDepartment #placeofworship
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.