Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: 1 ली ते 8 वी तील विद्यार्थ्यांना मिळणार एक जोडी बुट व पायमोजे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
एक लाखाच्या वर विद्यार्थ्यांसाठी पाऊणे दोन कोटी रुपये वर्ग आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. 19 जून 2024) -         मोफत गणवेश योजनेप्र...

एक लाखाच्या वर विद्यार्थ्यांसाठी पाऊणे दोन कोटी रुपये वर्ग
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 19 जून 2024) -
        मोफत गणवेश योजनेप्रमाणेच शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता 1 ली 8 वी मधील सर्व विद्यार्थ्यांना सन 2023-24 पासून दरवर्षी एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे चा लाभ शाळा व्यवस्थापन समितीकडून देण्यात येत आहे. याकरीता प्रति विद्यार्थी 170 रुपये इतकी रक्कम निश्चित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील 1610 शाळांमधील 1 लक्ष 2 हजार 425 विद्यार्थ्यांकरीता प्रति विद्यार्थी 170 रुपये याप्रमाणे एकूण 1 कोटी 74 लक्ष 12 हजार 250 रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून सर्व विद्यार्थ्यांना एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजेचा लाभ देण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. यांनी कळविले आहे.

        केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 8 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या मुलांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. तसेच सन 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या मुलांनासुद्धा देण्याबाबतचा निर्णय 6 जुलै 2023 च्या शासन निर्णयाद्वारे घेण्यात आला. केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत गणवेश योजनेकरीता निर्धारीत केलेल्या प्रती गणवेश 300 रुपये याप्रमाणे राज्य शासनानेसुध्दा दोन गणवेशाकरीता प्रति विद्यार्थी 600 रुपये रक्कम निश्चित केली आहे.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #chandrapurdistrict #Freeuniformscheme #CentralGovt #LocalGovernmentSchools #ChiefExecutiveOfficer #zilhaparishadchandrapur #Holisticeducationprograms #Educational

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top