देवराव भोंगळे यांनी केली कठोर कारवाईची मागणी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०१ जून २०२४) -
महाडच्या चवदार तळ्याकाठी महामानव, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नवा इतिहास घडवला होता; आणि त्याच पवित्र स्थळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून त्यांचा घोर अपमान केला.
या बुद्धीहिन आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड याच्या कृत्याचा जाहीर निषेध नोंदवत आज भारतीय जनता पार्टी राजुरा तालुका व शहराच्या वतीने विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पंचायत समिती समोरील संविधान चौक परीसरात आव्हाडांविरोधात तिव्र घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले.
त्यानंतर याठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदाधिकाऱ्यांनी अभिवादन ही केले. भारताला संविधान देणाऱ्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा असा अवमान करणार्या मुर्ख आव्हाडावर कायद्याने कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची आग्रही मागणी असल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले.
या आंदोलनात शहराध्यक्ष सुरेश रागीट, जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, जिल्हा सचिव संजय उपग्नालावार, सचिन डोहे, जनार्धन निकोडे, महादेव तपासे, संजय जयपुरकर, विनोद नरेन्दुलवार, श्रीमती उज्ज्वला जयपुरकर, छबिलाल नाईक, अजय साकिनाला, किशोर रागीट, सुधीर केशट्टीवार, सचिन भोयर, लक्ष्मी बिस्वास, राजेश वाटेकर, मंगल चव्हाण, नागराज केराम, महेश झाडे, प्रशांत साबळे, रफीक शहा, करण हावडा, स्वप्निल कोडापे, आकाश आत्राम, नवनाथ झामोर, नामदेव रागीट, आकाश गोगलवार, बालु पेरका, दत्तू बावणे व सुजीत गोगलवार यांचेसह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #Mahamanav #BharatRatna #DrBabasahebAmbedkar #DrBabasahebAmbedkarstatue #sanvidhanchauk #BJP #deoravbhongale
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.