Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: स्थानिक कामगारांचे CMPL कंपनी विरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. 10 जून 2024) -         वेकोली बल्लारपूर क्षेत्रात कोळसा खाणीत सीएमपीएल माती उत्खनन करणाऱ्या कंपनीने काम...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 10 जून 2024) -
        वेकोली बल्लारपूर क्षेत्रात कोळसा खाणीत सीएमपीएल माती उत्खनन करणाऱ्या कंपनीने काम संपल्याचे कारण सामोरे करत सर्व कामगारांना पत्र पाठवून कामावरून डावलण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करीत असल्याचा आरोप लावत कंपनी विरोधात अनैशा वाहन चालक कामगार संघटने द्वारे आजपासून स्थानिक तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 

        सदर कंपनीचे दुसरे काम हे वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातच सास्ती येथेच सुरु असून कंपनीने स्थानिक कामगारांना कामावरून कमी न करता सास्ती येथे स्थलांतर करण्यात यावे. कंपनीने स्थानिक कामगारांना कामावरून कमी केल्यास त्यांच्यावर तसेच त्याच्या परिवारावर वेळ येणार असल्याने त्यांना कमी करण्यात येऊ नये अशी मागणी अनैशा वाहन चालक कामगार संघटनेने केली आहे. 

        आज 10 जून 2024 दुपारपासून महापुरुषांना अभिवादन करून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आले. आंदोलनात अनैशा वाहन चालक कामगार संघटना चे संस्थापक अध्यक्ष सुरज उपरे, सामजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात स्थानिक तहसील कार्यालयाच्या गेट जवळ आंदोलनाला सुरुवात करण्यात आले आहे. बेमुदत धरणे आंदोलनात आंदोलनकर्ते आकाश ताकसांडे, ऋषी चौधरी, अजय इग्रपवार, साई कुमार मोगलीवार, राकेश चेनमेंवार, श्रीकांत जलावार, पांडुरंग मंगाम, आशिष पझारे, माणिक संजीव, दशरथ कोंडावार, मिथुन कांबळे, राहुल राठोड, विशाल सल्लम, संकेत भादिकर, शंकर काळे, प्रवीण जेल्लेल, प्रवीण चेनवेंनवार यांनी उपस्थिती दर्शविली आहे. 

        स्थानिक कामगारांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा आक्रमक पावित्रा सुरज उपरे यांनी घेतला आहे. सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात भूमिपुत्र व स्थानिक कामगारांवर ठेकेदार व उद्योजक, राजकीय पुढारी शासन व प्रशासनाला हाताशी धरून सातत्याने अन्याय करत आहे. अश्या अन्यायाविरुद्ध आम्ही सतत लढा देऊ असे म्हटले आहे. 

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #sasti #wclballarpurarea #CMPLCompany #wcloverburdan #coalmines #Anaishavahanchalakkamgarsanghatna #bhushanfuse #surajupare

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top