Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वरुर रोड येथील बार अँड रेस्टॉरंट संचालकावर प्राणघातक हल्ला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा तालुक्यातील घटना आमचा विदर्भ -  राजुरा (दि. ११ जून २०२४) -         वरुर रोड येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या हॉटेल सितारा बार अँड रेस्ट...

राजुरा तालुक्यातील घटना
आमचा विदर्भ - 
राजुरा (दि. ११ जून २०२४) -
        वरुर रोड येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या हॉटेल सितारा बार अँड रेस्टॉरंट येथे काल रात्री दहा वाजताच्या सुमारास बार संचालकावर प्राणघातक हल्ला झाला असून बार संचालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.  

        सोमवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास मद्य प्राशन करण्यासाठी आलेल्या इसमाने बिलाच्या रकमेवरून वादाची सुरुवात झाली. नशेत असलेल्या ग्राहकाने बार मध्ये नासधूस करून बार चालक नारायण मंथापुरवार वय ५५ व त्याचा मुलगा व्यंकटेश मंथापुरवार वय ३५ यांना मारहाण केली. यावेळी मुलगा व्यंकटेश याच्या डोक्यावर मार लागल्याने तो रक्तबंबाळ झाला असून त्याला चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी आरोपी राजेश गुमलवार वय ३४ रा. राजुरा, भीमराव गुमलवार वय २९ रा. वरुर रोड, रोहित कोकलवार वय २३ रा. वरुर रोड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हाके करीत आहे. 

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #warurroad #PoliceStationRajura #crime #BarandRestaurant

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top