आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 25 मे 2024) -
वेकोलि सास्ती ओपेनकास्ट माईन मध्ये कर्तव्यावर असताना सुरक्षा रक्षक सोहेल खान बेपत्ता झाल्याने वेकोलि प्रशासनात खळबळ माजली आहे. सुरक्षा रक्षक सोहेल खान याची दुपारपर्यंत खदानीचा शोध घेतल्यानंतरही काही पत्ता लागला नाही. शेवटी सायंकाळी राजुरा पोलिसात सुरक्षा रक्षक हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 24 मे ला दुसरी शिफ्ट दुपारी 4 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत होती, खाणीत उभ्या असलेल्या मशिनरीतून डिझेल चोरीला गेल्याने ओबी रात्री 8 वाजता गस्तीसाठी डम्पिंगला गेले होते. मात्र सुरक्षा रक्षक ड्युटी नंतर घरी पोहचला नसल्याने सकाळी कुटुंबीयांनी शोध मोहीम सुरू केली. अश्यातच सुरक्षा रक्षकच बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली.
स्थानिक वेकोलि प्रशासनाने दुपारपर्यंत खदान परिसरात सोहेलचा शोध घेतला मात्र सोहेल सापडला नाही, अखेर वेकोलि सास्ती ओपेनकास्ट प्रशासनाने राजुरा पोलिसात सुरक्षा रक्षकच बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. सोहेल हा मुडी स्वभावाचा असल्याची माहिती वेकोलिच्या कर्मचाऱ्यांनी दिली. वेकोलिमध्ये कोळसा, भंगार, डिझेल चोरणारे चोरटयांनी कदाचित त्याचे अपहरण केले असावे अशी भीतीही काहींनी व्यक्त केली मात्र ज्या वाहनात पेट्रोलिंग करण्यासाठी गेले होते. त्या वाहनाचे डिझेल चोरीला गेलेले नाही, त्यामुळे चोरट्यांनी ते पळवून नेल्याची भीती निराधार असल्याचेही काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच आजपर्यंत अशी कोणतीही घटना खदानीत घडली नसून घटनेमुळे वेकोलि प्रशासनात खळबळ माजली आहे.
#news #breakingnews #aamchavidarbha #vidarbha #maharashtra
#chandrapur #rajura #wcl #ballarpurarea #sastiopencastmoneproject
#GMofficeballarpurarea ##securityguard #policestationeajura #Coal #scrap #diesel #thieves
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.