राजुरा पोलिसांचा तपास सुरू
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 27 मे 2024)
बल्लारपूर क्षेत्रातील वेकोलीच्या धोपटाळा खुल्या कोळसा खाणीत चोरयांचे सत्र सुरू असतानाच MH 40 CT 0870 बोलेरो चारचाकी वाहणातून वेकोलीच्या धोपटाळा खुल्या कोळसा खाणीतून दोन टन लोखंडी भंगार नेताना सुरक्षा रक्षकाने पकडले व राजुरा पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपी अक्षय पहानपटे (26) राहणार राजीव गांधी चौक राजुरा यांच्यावर भादवी कलम 379 अन्वये राजुरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग डी. हाके, सुनील गौरकार, किशोर तुमराम, तिरुपती जाधव, योगेश पिदूरकर, महेश बोलगोडवार, रामा बिंगेवाड सह राजुरा पोलीस पुढील तपास सुरू आहे. वेकोली व्यवस्थापक यांच्या प्रवासाकरिता असलेल्या या बोलेरो गाडीतून भंगार चोरी सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या चोरीवरून मागील काही चोऱ्यांचे धागे हाती लागतील का याचा तपास सुरू आहे.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #theft
#chandrapur #rajura #wcl #ballarpurarea #police #policestation #rajura
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.