भीषण गर्मी ने दोन दिवसात सहा जण दगावल्याने परिसरात भीतीचे वातावरण
विद्युत विभागाविषयी नागरिकांमध्ये रोष
नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत
कोरपना (दि. 29 मे 2024) -
कोरपना तालुक्यातील आवाळपुर येथे मागील दोन दिवसात सहा जण दगावल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, आवाळपुर येथील रहिवाशी असलेला संजय मांदाळे नामक युवक हा रोहित मुंगुल यांच्या शेतात सकाळी गेला होता. दुपारी दोन वाजताच्या सुमारास सदर युवक शेतातच बेशुद्ध असल्याची माहिती मिळाली. गावकऱ्यांनी शेतात जाऊन बघितले असता संजय विठ्ठल मांदाळे वय ४० रा. आवाळपुर हा मृत असल्याची खात्री झाली. सदर मृतदेहाचा शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे करण्यात आले. पुढील तपास गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी संदिप आडकीने, तिरुपती माने, ज्ञानेश्वर मडावी करीत आहेत.
आवाळपुरात दोन दिवसात सहा नागरिकांचा मृत्यू
दि. २७ चा रात्री गावातील ७० वर्षीय इसम यांचा मृत्यू झाला, तर २७ तारखेला दुपारी ७२ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला, २८ ला सकाळच्या सुमारास ६८ वर्षीय तर दुपारी संजय मांदाळे यांचा शेतात मृत्यू झाले. आज सकाळी ३० वर्षीय इसमाचा मृत्यु झाल्याने दोन दिवसात पाच नागरिक अचानक दगावल्याने यांचा बळी उष्माघाताने तर गेला नाही ना अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. अति उष्णता वाढल्यामुळे गावातील अनेक वृद्ध नागरिकांची प्रकृति गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
विद्युत विभागाविषयी नागरिकांमध्ये रोष
भीषण गर्मी असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात उष्णता वाढलेली आहे. त्यातच मागील ३-४ दिवसांपासून दिवसभर व रात्री दीड ते दोनचा सुमारास दोन ते तीन तासांकरिता सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे पूर्ते हाल झाले आहे. त्यातच आवाळपुर गावातील महादेव वासेकर यांचा रात्री विद्युत पुरवठा खंडित असताना मृत्यू झाल्याने या भीषण गर्मीमध्ये वारंवार होणारा विद्युत पुरवठा हा ही त्यांचा मृत्यूस तेवढाच कारणीभूत तर नाहीना, अशी गावात चर्चा सुरू असून परिसरातील संतप्त नागरिक लवकरच महावितरण चा कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार अशी नागरिकांकडून माहिती मिळाली आहे.
#news #breakingnews #aamchavidarbha #vidarbha #maharashtra #death
#chandrapur #rajura #korpana #aawalpur #mseb #heatstroke
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.