Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ब्रिजभूषण पाझारे यांच्या नेतृत्वात तुकूम येथे जेष्ठ नागरिक संघाची बैठक संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. २८ मे 2024) -         महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २८ मे 2024) -
        महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मूनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात महामंत्री तथा संजय गांधी निराधार समिती चंद्रपूर महानगराचे अध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे यांनी तुकूम येथील श्री स्वामी समर्थ जेष्ठ नागरिक संघाची बैठक आयोजित केली. बैठकीत जेष्ठ नागरिकांकरिता असलेल्या शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.

        सदर बैठकीत अध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे यांनी विशेष सहाय्य योजनांची माहिती दिली त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निराधार योजना, त्याचबरोबर रमाई योजना, बाल संगोपन योजना, नवीन राशन कार्ड इत्यादीविषयीची माहिती दिली. तसेच श्री स्वामी समर्थ जेष्ठ नागरिक संघातील पात्र लाभार्थ्यांना फार्मचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर वार्डातील इतर भौतिक समस्या जाणून त्याचे निवारण करण्यात आले. तसेच वार्डातील भौतिक सुविधेबाबत माहिती मागविण्यात आली व त्याबाबत लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

        यावेळी सुभाष कासनगोट्टूवार, रमेश ददगयाल, शशिकला निखाडे, कांता वैरागडे, कमला काटरवर, यशोदा वीरुटकर, विमल तळवेकर, उमा बोरगिलवार, प्रेमीला टेकाम, पुनाबाई मडावी, मनिषा गटलेवार,  हमीदा बानो, जहिदा मॅडम, मंदा देवगडे, शशिकला वराडे, लता विमलवार, अशा झिंगरे, शीलाताई, सरिता बोकडे, पुष्पलता धर्मपूर्तीवर, प्रकाश कोंडावार, लीना जवासे व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

#news #breakingnews #aamchavidarbha #vidarbha #maharashtra #chandrapur #tukum #SeniorCitizensAssociation #SudhirBhauMoongantiwar #BrijbhushanPazare #SanjayGandhiFoundationCommittee #SriSwamiSamarthSeniorCitizenSangh

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top