Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: श्रीरामनवमी चे बॅनर काढल्याने जनतेत रोष
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नाका नंबर तीन येथे चक्काजाम सुरू  जारोच्या संख्येत नागरिक रस्त्यावर आमच्या विदर्भ - दीपक शर्मा राजुरा - (दि. 17 एप्रिल 2024)         श्रीराम...


नाका नंबर तीन येथे चक्काजाम सुरू 

जारोच्या संख्येत नागरिक रस्त्यावर

आमच्या विदर्भ - दीपक शर्मा

राजुरा - (दि. 17 एप्रिल 2024)

        श्रीराम नवमी प्रित्यर्थ लावण्यात आलेले बॅनर नगरपरिषदे द्वारा काही वेळापूर्वी काढण्यात आल्याने राम भक्तांनी एकत्र येऊन नगरपरिषदेच्या विरोधात नाका नंबर तीन येते चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. राम भक्तांनी नगर परिषद चमुख्याधिकारी जाधव यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. रामभक्तांनी आरोप लावले आहे की नुकतीच रमजान ईद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्याने शहरात बॅनर लावण्यात आलेले होते, मात्र नगरपरिषदे द्वारा फक्त श्रीरामनवमीच्याच बॅनरवर का अशी कारवाई करण्यात आली यामुळे हे आंदोलन सुरू असून मुख्याधिकाऱ्याला त्वरित बडतर्फ करण्याची मागणी या चक्काजाम आंदोलनच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आंदोलनाला जवळपास एक तास झाले असून रस्त्याच्या दोन्हीकडून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. (Shri ram navmi) (aamcha vidarbha) (rajura) (chakka jaam aandolan)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top