Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गुडी सजावट स्पर्धेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जेसीआय राजुरा ब्लॅक डायमंड द्वारे आयोजन राजुरा (दि. 13 अप्रैल 2024) -        जेसीआय राजुरा ब्लॅक डायमंड सिटी तर्फे हिंदू नववर्ष निमित्याने स...

जेसीआय राजुरा ब्लॅक डायमंड द्वारे आयोजन
राजुरा (दि. 13 अप्रैल 2024) -
       जेसीआय राजुरा ब्लॅक डायमंड सिटी तर्फे हिंदू नववर्ष निमित्याने साजरा करण्यात येणाऱ्या गुडी पाडवा निमित्त "गुडी सजावट स्पर्धेचे" आयोजन ऑनलाइन पद्धतीने राजुरा वासीयांसाठी करण्यात आले होते. यात लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. एकूण 17 स्पर्धकांनी स्फुर्तपणे आपला सहभाग नोंदविला. 

        जेसीआय राजुरा ब्लॅक डायमंड सिटी चे सचिव जेसी अंकुश चव्हाण यांच्या संकल्पनेतून ही प्रतियोगिता आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत क्रमांक पटकाविणाऱ्या प्रथम तीन स्पर्धकांना "वेडिंग वर्ल्ड राजुरा" च्या संचालिका पल्लवी अंकुश चव्हाण यांच्याकडून सन्मान चिन्ह व भेटवस्तू प्रदान करण्यात आले.

        गुढी सजावट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सास्ती येथील पूजा प्रवीण भोयर यांनी पटकावला तसेच द्वितीय क्रमांक गढी वाडी येथील साधना राजू गौरशेट्टीवार तर तृतीय क्रमांक देशपांडे वाडी येथील ईशानी निखिल देशपांडे यांनी पटकावला. विजेत्यांना सुषमा शुक्ला, जेसीआय राजुरा ब्लॅक डायमंड सिटी चे अध्यक्ष जहीर लखानी, सचिव अंकुश चव्हाण व उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व भेटवस्तू प्रदान करून सन्माननीत करण्यात आले.

        बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन साई हॉटेल येथे करण्यात आले होते. बक्षीस वितरण कार्यक्रमात झोन वाईस प्रेसिडेंट जेसी सुषमा शुक्ला, जेसीआय राजुरा ब्लॅक डायमंड सिटी चे अध्यक्ष जेसी जहिर लाखानी, सचिव अंकुश चव्हाण, कोषाध्यक्ष प्रणय विरमलवार, व्हाईस प्रेसिडेंट सुशील कल्लूरवार, अभिषेक कुल्लूरवार, मोहम्मद अब्बास खेरानी, अनिल चव्हाण, शुभम मुने, मनोज लांडे, पूजा भोयर, साधना गौरशेट्टीवार, ईशानी देशपांडे , निखिल देशपांडे, प्रवीण भोयर आदी उपस्थित होते. 

(aamcha vidarbha) (vidarbha) (maharashtra) (rajasthani mahila mandal) (rajura) (JCI black diamond city)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top