Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: हनुमान जयंतीनिमित्य आप कार्यालयात मंगळवारी बुंदी व शरबत चे वाटप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. 22 एप्रिल 2024) -         आम आदमी पार्टी, जिल्हा चंद्रपूर चे कामगार जिल्हाध्यक्ष तथा उपजिल्हाध्यक्ष सुर...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 22 एप्रिल 2024) -
        आम आदमी पार्टी, जिल्हा चंद्रपूर चे कामगार जिल्हाध्यक्ष तथा उपजिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे (Suraj Thackeray) यांच्यावतीने आम आदमी पार्टी राजुरा तर्फे संकटमोचन ‘पवनपुत्र हनुमान की जय’, ‘जय श्रीराम’ असा जयघोष करत मंगळवार दि. २३ एप्रिल २०२४ रोजी शहरात पारंपरिक पद्धतीने भक्तिमय वातावरणात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून आम आदमी पक्ष जनसंपर्क कार्यालय समोर बुंदी व शरबत चे वाटप करण्यात येणार आहे. (hanuman jayanti) (aam aadami party)

         राजुरा विधानसभा क्षेत्रामधील वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे तथा जनसामान्यांच्या गंभीर समस्यांचे निवारण करण्याकरिता  सुरज ठाकरे यांच्याकडे समस्या घेऊन येणाऱ्या जनतेप्रती ची भूमिका ही नेहमीच संकट मोचक सारखीच असल्याने राजुरातील स्थानिक आजी-माजींकळे ज्यांच्या समस्या मार्गी लागत नाहीत अशा निराश झालेल्या नागरिकांच्या समस्या सुरज ठाकरे यांनी वेळोवेळी मार्गी लावल्या असल्याने त्यांच्या याच कामाच्या आधारावर राजुरा येथील जनतेचं स्वप्न हे सुरज ठाकरे यांना येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून बघण्याचे झाले असल्याने जनतेच्या आग्रहास्तव निश्चितच निवडणुकीच्या रणांगणात सुरज ठाकरे उतरतील हे निश्चित. या पर्वाची सुरुवात ही हनुमान जयंतीच्या पावन पर्वा वर बुंदी व शरबत चे वाटप करून करण्यात येत आहे. (aamcha vidarbha) (vidarbha) (patrakar) (rajura)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top