Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आगीत शेतातील गोठा जळून खाक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शॉर्ट सर्किटमुळे लागली आग गोवरी शेतशिवारातील घटना आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २४ एप्रिल २०२४) -         तालुक्यातील गोवरी येथील शेत...

शॉर्ट सर्किटमुळे लागली आग
गोवरी शेतशिवारातील घटना
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २४ एप्रिल २०२४) -
        तालुक्यातील गोवरी येथील शेतकरी नागेश्वर ठेंगणे यांचे शेतातील कवेलूच्या गोठ्याला रविवारी सायं. ७ वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. या आगीत गोठ्यात ठेवलेले शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

        राजुरा तालुक्यात रविवारी काही ठिकाणी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यात आलेल्या वादळाने गोवरी येथील शेतकरी नागेश्वर ठेंगणे यांच्या शेतातील गोठ्यात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.गोठ्याच्या वरून वीज पंपांना वीज पुरवठा करणाऱ्या तारा गेल्या आहेत. शेतातील वीज खांब वाकून असल्याने वाऱ्याने तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन शॉर्ट सर्किटमुळे आगीची ठिणगी पडून वाळलेल्या गवताने पेट घेतला. या आगीत वाऱ्याने आग शेतातील गोठ्यापर्यंत पसरत गेली. यात गोठ्याला आग लागून त्यात ठेवलेले साहित्य जळून खाक झाले. वीज वितरण कंपनीने  खबरदारी घेत शेतातील वीज खांब सुरळीत केल्यास आगीच्या घटनांना पायबंद घालता येईल. (aamcha vidarbha) (vidarbha) (rajura)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top