Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चंद्रपूर रेल्वे स्टेशन येथे अज्ञात इसमाची हत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. १२ मार्च २०२४) -         चंद्रपूर येथील रेल्वे स्टेशन येथे पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास एका अज्ञात इस...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १२ मार्च २०२४) -
        चंद्रपूर येथील रेल्वे स्टेशन येथे पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास एका अज्ञात इसमावर चाकूने हल्ला करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. 

        मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर येथील रेल्वे स्टेशन येथे आरोपी साहिल उर्फ माट्या राजु आंबेकर वय २४ वर्ष रा. विठ्ठल मंदिर वार्ड लिंबाडकर वाडी चंद्रपूर हा रेल्वे स्टेशन येथील तिकीट घर येथे एका बाका वर झोपून होता. त्याच वेळी अज्ञात व्यक्तीने ने आरोपी याचे पँट व शर्ट चे खिसे तपासत होता. तसेच आरोपीचा दुपट्टा आपल्या गळ्यात टाकून आणखी त्याचे खिसे तपासायला लागला. त्यातच आरोपीला जाग येऊन अज्ञात व्यक्ती ला याबाबत विचारले असता दोघात बाचाबाची झाली. त्यात आरोपी साहिल उर्फ माट्या राजु आंबेकर ने आपल्या जवळील चाकू ने अज्ञात व्यक्ती वर चाकू हल्ला केले. ही माहिती मिळताच चंद्रपूर येथील आरपीएफ ने त्याला मेडिकल कॉलेजमध्ये भर्ती केले. उपचार दरम्यान अज्ञात व्यक्ती चे मृत्यू झाले. आरोपी साहिल उर्फ माट्या हा हत्या करून फरार झाला होता. 

        दरम्यान बल्लारशाह रेल्वे स्टेशन येथील जीआरपी पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी भेट देऊन कारवाई सुरू करून आरोपीला दोन तासात अटक केले. घटनास्थळी लोहमार्ग नागपूर चे पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी भेट देऊन पाहणी करून कारवाईचे निर्देश दिले. पुढील तपास लोहमार्ग नागपूर चे पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांचा मार्गदर्शनाखाली वर्धा रेल्वे स्टेशन चे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल चापले यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नारनवरे, पो.ह. खडतकर, पोशी पंकज भांगे, संदेश लोणारे, मपोशी किर्ती मेश्राम करीत आहेत. (aamcha vidarbha) (chandrapur)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top