Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: धक्कादायक ; मुलाने कुल्हाडीने केली आईची हत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वडील गंभीर जखमी  आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी कोरपना (दि. 21 फेब्रुवारी 2024)          कोरपना तालुक्यातील लोणी येथील एका...

वडील गंभीर जखमी 
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. 21 फेब्रुवारी 2024) 
        कोरपना तालुक्यातील लोणी येथील एका मुलाने आपल्या वयोवृद्ध आई वडिलाला एका खोलीत बंद करून कुऱ्हाडीने वार केल्याची घटना आज 21 फेब्रुवारी रोजी दुपारी अंदाजे 2 च्या सुमारास घडली. घटनेत आईचा जागीच मृत्यू झाला असून वडील गंभीर जखमी आहे. वडीलाला  उपचारासाठी 
 कोरपना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेनंतर फरार आरोपीला अटक करण्यात आल्याचे कळते.

        मनोज पांडूरंग सातपुते वयवर्ष अंदाजे 45, असे आरोपी मुलाचे नाव असल्याचे कळते. शेतीच्या ठेक्यातून मिळालेल्या पैशातून यांच्यात हा वाद झाला आणि या वादातून सदर घटना घडल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. आरोपी मुलांने एका खोलीत आई आणि वडीलाला बंद केले आणि अत्यंत क्रूरतेने आईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने 4 आणि हातावर 2 वार करून आईला जागीच ठार केला तर वडीलाच्या डोक्यावर 2 वार करून त्याला गंभीर जखमी करून वहीनीच्या मागे धावला, मात्र ती एका खोलीत लपवून अंदरून दरवाजा बंद केल्याने तिचा जीव वाचला.घटनेनंतर आरोपी मुलाने तेथुन पळ काढला मात्र पोलिसांनी त्याला अटक केली. आहे.पुढील कारवाई कोरपना पोलीस करीत आहे. पुढे काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (aamcha vidarbha) (korpana) (Crime)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top