Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: चंद्रपुरात भिवापुर वॉर्डात शिरले अस्वल ; हल्ल्याचा प्रयत्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जंगली प्राण्यांच्या शहराच्या रस्त्यावर मुक्त संचार बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी बघा सीसीटीव्ही फुटेज व्हिडीओ आमचा विदर्भ - दीपक शर्मा ...

जंगली प्राण्यांच्या शहराच्या रस्त्यावर मुक्त संचार
बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी
बघा सीसीटीव्ही फुटेज व्हिडीओ
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १ फेब्रुवारी २०२४) -
        ताडोबा जंगलाला लागून असल्याने चंद्रपूर शहरात वन्य प्राण्यांच्या शिरकाव होणे ही आता नित्याचीच बाब झाली आहे. कधी बिबट्या तर कधी अस्वल रात्रीच्या वेळी शहरातील रस्त्यावर फिरताना अनेकदा दिसतात. अशीच एक अस्वल दि. ३१ जानेवारी बुधवारी मध्यरात्री 12.40 वाजताच्या दरम्यान भिवापूर प्रभागातील इंडियन चिकन सेंटर सुपर मार्केट जवळील रस्त्यावर फिरताना दिसली. यावेळी काही नागरिकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला मात्र सावधगिरी दाखवत दुकानांचे शटर लावल्याने नागरिक थोडक्यात बचावले. लालपेठ कॉलरीच्या आजूबाजूला पसरलेल्या झुडपातून हे अस्वल आल्याची शक्यता स्थानिक नागरिकाकडून व्यक्त केली जात आहे. शहरातील मध्यवर्ती भागातील भिवापूर वार्डातील सुपर मार्केट आणि इंडियन चिकन सेंटर जवळ काही लोक उभे होते, दरम्यान बुधवारी मध्यरात्री स्थानिकांना एक मोठी अस्वल रस्त्यावर फिरताना दिसली. अस्वलाला पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. दरम्यान नागरिकांकडे बघताच अस्वल त्यांच्याकडे वळली, काही जण घाबरून पळू लागले यादरम्यान काही लोक दुकानात शिरले, अस्वलाने एका व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु सावधगिरी बाळगून सदर व्यक्ती एका दुकानात शिरला व शटर खाली केले. त्यामुळे त्या व्यक्तीच्या जीव वाचला अन्यथा अनुचित घटना घडू शकली असती. यापूर्वीही शहरातील हवेली गार्डन, आंबेडकर सभागृह परिसर, वडगाव वार्ड, लक्ष्मी नगर वार्ड, दुर्गापूर परिसरात तसेच पंधरा दिवसांपूर्वी महाकाली मंदिर परिसर तथा हनुमान खिडकी जवळ अस्वलीचे दर्शन झाले होते. (Free movement of wild animals on city streets) (aamcha vidarbha) (chandrapur)

रात्री रस्त्यावर फिरू नये
        शहरातील रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या अस्वलांच्या बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे, मात्र यावेळी परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरू नये असे आवाहन वन विभागाने केले आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top