Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अल्ट्राटेक, अंबुजा, एसीसी-सीमेंट कंपनीच्या कामगारांचे ठिय्या आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वेतनवाढ करिता कामगारांचा ‘आक्रोश' कामगारांच्या न्याय्य मागण्या तातडीने सोडविण्याच्या आमदार सुभाष धोटेंच्या व्यवस्थापनाला सुचना  आमचा विद...

वेतनवाढ करिता कामगारांचा ‘आक्रोश'
कामगारांच्या न्याय्य मागण्या तातडीने सोडविण्याच्या आमदार सुभाष धोटेंच्या व्यवस्थापनाला सुचना 
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. ३० जानेवारी २०२४) -
        कोरपना तालुक्यातील अंबुजा, अल्ट्राटेक, एसीसी सिमेंट कंपनीतील कामगारांनी आपल्या वेतनवाढीच्या मागण्यासंदर्भात आंदोलन करीत आज सिमेंट कंपन्या बंद पाडल्या. या कंपनीच्या कामगारांनी कंपनीतील सर्व मशिनरी यंत्रणा बंद पाडत संपूर्ण सिमेंट प्लांट बंद केला. विजय क्रांती कामगार संघटनेच्या नेतृत्वात सर्व कामगारांनी एकत्रित येऊन प्लांट मधे ठिय्या मांडला. (subhash dhote)

        अल्ट्राटेक, अंबुजा, एसीसी-सीमेंट कंपनीच्या कामगारांचे ठिय्या आंदोलन स्थळी आमदार सुभाष धोटे यांनी भेट देऊन कामगारांच्या समस्या जाणुन घेतल्या, कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि कामगारांच्या न्याय्य मागण्या तातडीने सोडविण्याच्या कंपनी व्यवस्थापनाला सुचना केल्या. यावेळी अंबुजा सिमेंट कंपनीचे कमर्शियल हेड सुब्बू लक्ष्मण, एच. आर. अनिल वर्मा, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, विजयक्रांती कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष विजय ठाकरे, गडचंदुरचे ठाणेदार शिंदे, गडचांदूर चे नगराध्यक्ष सविता टेकाम, अभय मुनोत, आशा खासरे, आशीष देरकर, शैलेश लोखंडे, कामगार प्रतिनिधी सुनील ढवस, दशरथ राऊत, कोरपणा तहसीलदार पी ऍस व्हटकर ठाणेदार शिंदे कंपनी व्यवस्थापन चे प्रतिनिधी नामीत मिश्रा, नारायणदत्त तिवारी, सतीश मिश्रा व कामगार उपस्थीत होते.

        तालुक्यात असलेल्या अल्ट्राटेक, अंबुजा, एसीसी-सीमेंट कंपनीत मागील काही वर्षांत स्थायी कामगार सेवानिवृत्त होत असल्याने स्थायी कामगारांच्या कामाचा ताण हा कंत्राटी कामगारांवर पडत आहे. कंपनीतील स्थायी वेज बोर्ड कामगारांच्या ठिकाणी कंत्राटी मधील कुशल अर्धकुशल, अकुशल कामगारांकडून कमी वेतनात काम करवून घेण्यात येत आहे. त्यामुळे, कामगारवर्गात तीव्र असंतोष आहे. त्याचे पडसाद मागील काही महिन्यांत कामगारांनी केलेल्या आंदोलनांवरून उमटलेले पाहायला मिळाले. सिमेंट कंपनीतील कंत्राटी कामगारांचे मागील काही माहिण्यांपासून वाढीव वेतनासाठी कंपनीच्या व्यवस्थापनाशी वारंवार पत्रव्यवहार सुरु आहेत. या संदर्भात कामगार आयुक्त, नागपूर यांच्याशी चर्चा करताना कंपनी व्यवस्थापनाकडून सकारात्मक पाऊल उचलताना दिसत नसल्याने व चर्चा निष्फळ होत असल्याने कामगारांमध्ये आक्रोश निर्माण झाला. अखेर आज कामगारांच्या संयमाचा बांध फुटला व कामगारांनी ठिय्या आंदोलन करत सिमेंट कंपन्या बंद पाडल्या. (aamcha vidarbh) (gachandur) (korpana)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top