Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मजुराचा पोटात शिरली शिरली लोखंडी सलाख़
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपूर ( दि. १६ जानेवारी २०२४ ) –         चंद्रपूर-नागपूर रस्त्यावरील डॉ. मेहरा हॉस्पिटलसमोर चार मजली बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पडल...

चंद्रपूर (दि. १६ जानेवारी २०२४) –
        चंद्रपूर-नागपूर रस्त्यावरील डॉ. मेहरा हॉस्पिटलसमोर चार मजली बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पडलेल्या मजुराच्या पोटात लोखंडी सळाख शिरल्याने तो गंभीर जखमी झाला. नंदकिशोर जखराखण पंच (वय 32, रा. अष्टभुजा वार्ड) असे गंभीर जखमी मजुराचे नाव आहे.

चंद्रपूर-नागपूर रस्त्यावर चार मजली इमारतीचे काम सुरू आहे. यावेळी अष्टभुजा वॉर्डातील रहिवासी नंदकिशोर हे कार्यरत होते. अचानक त्याच्यावर सेंटरिंग पट्ट्या पडल्याने तोल जाऊन इमारतीवरून खाली पडला. खाली पडताच त्याच्या पोटात खांबाचा लोखंडी रॉड शिरला. दरम्यान आसपासच्या नागरिकांनी त्याला वाचविण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र रॉड पोटातून आत गेल्याने कटरच्या साहाय्याने तो कापावा लागला. तत्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. माहितीच्या आधारे एपीआय स्वप्नील गोपाळे, देविदास राठोड यांनी पोहोचून पंचनामा केला.

 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top