Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: हर्षा कंपनीत तोडफोड, कंपनी जाळण्याची दिली धमकी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शिवसेना शहर प्रमुखावर गुन्हा दाखल आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. 15 डिसेंबर 2023) -         वेकोलि बल्लारपूर क्षेत्रांतर्गत पोवनी उपक्...

शिवसेना शहर प्रमुखावर गुन्हा दाखल
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 15 डिसेंबर 2023) -
        वेकोलि बल्लारपूर क्षेत्रांतर्गत पोवनी उपक्षेत्रात ओव्हरबर्डन व कोळसा उत्खननाचे काम करणारी हर्षा कन्स्ट्रक्शन कंपनीत शिवसेनेचे शहरप्रमुख सूर्यवंशी आणि त्यांच्यासोबत स्कॉर्पिओमध्ये आलेले अन्य तीन जण दुपारी एकच्या सुमारास साखरी येथील प्रकल्प कॅम्प कार्यालयात आले. शिवसेना शहरप्रमुख सूर्यवंशी व त्यांच्यासोबत असलेल्या अन्य तीन व्यक्तींनी कार्यालयात येऊन कामगारांना कायम करणे, अनुदान व सुविधा देण्याबाबत दिलेल्या निवेदनाचे काय झाले, याबाबत उपस्थित कर्मचाऱ्यांकडून विचारणा केली. उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले कि, वेकोलि पोवनी 2 उपप्रादेशिक कार्यालयात जाऊन चौकशी करा, तेथून आदेश मिळाल्यास आम्ही कन्फोर्मेशन देऊ. हे ऐकून त्यांनी आमच्या खर्चासाठी काही पैशांची मागणी केली. परंतु उपस्थित कर्मचाऱ्याने पैसे देण्यास असमर्थता दर्शविल्यास शिवसेना शहरप्रमुख खुशाल उमाकांत सूर्यवंशी यांनी कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फोडून कार्यालयाची तोडफोड केली आणि आमच्या मागण्या मान्य न केल्यास कंपनी जाळून टाकण्याची धमकी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिली. मुख्य गेटवर दुसऱ्या शिफ्टसाठी येणाऱ्या कामगारांना सुमारे तासभर कामावर जाण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे कंपनीचे कामकाज तासभर विस्कळीत झाले होते. कंपनी व्यवस्थापकाने शिवसेना शहरप्रमुख खुशाल उमाकांत सूर्यवंशी यांच्यासह तिघांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सूर्यवंशी आणि अन्य तिघांविरुद्ध भादंवि 336, 34, 384, 451, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र, सूर्यवंशी आणि त्याचे साथीदार पोलिसांपासून तावडीतून दूर आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत. (aamcha vidarbha) (rajura) (shivsena)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top