Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरपन्याचे तत्कालीन तहसीलदार विरुद्ध प्रभावी कार्यवाही करण्याची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सोशल एक्टिविस्ट विजय ठाकरे यांचे थेट महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील कडे निवेदन आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी कोरपना (द...

सोशल एक्टिविस्ट विजय ठाकरे यांचे थेट महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील कडे निवेदन
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. 15 डिसेंबर 2023) -
        अवैध गौण खनिज व रेती (वाळू) तस्करी चे आरोप असलेल्या कोरपण्याचे तत्कालीन तहसीलदार तसेच विदर्भातील इतर 50 वादग्रस्त तहसीलदार, जिल्हा खनिकर्म विभागाचे अधिकारी ह्यांची चौकशी करून तत्काल अहवाल प्राप्त करून सेवा शर्तिचे नियम अनुसार प्रभावी कार्यवाही करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता आणि सोशल एक्टिविस्ट विजय ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री  राधाकृष्ण विखे पाटील यांना केली होती.

        शासनाने कोरपना तालुक्यातील वादग्रस्त आणि रेती तस्करीत भागीदार असलेल्या तहसीलदार व इतर 50 तहसीलदार यांचे विरूद्ध चौकशी करून सेवा शर्तीच्या नियमानुसार कार्यवाही करण्याचे दोन-तीन वेळा आदेश विभागीय आयुक्त नागपुर ह्यांना दिले होते. त्यानुसार कारवाई करत महसुल आयुक्त नागपुर ह्यांनी संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी ह्यांना आदेश देऊन चौकशी अहवाल देण्याचे सुद्धा आदेश पत्र देण्यात आले होते. मात्र याकडे दुर्लक्ष असून अजूनही एकाही वादग्रस्त तहसीलदारांची चौकशी झाली नाही. एवढ्या मोठ्य प्रमाणात पुराव्यासहित दाखल तक्रारीची दखल घेतल्या जात नसल्याने रेती (वाळू) व अन्य गौण खनिज तस्करांचे तार नदीपात्रा पासून तर महसुल मंत्रालया पर्यंत अर्थकारण हितसंबंध जुड़ले आहे की काय असा प्रश्न पडत आहे. सदर प्रकरण गांभीर्याने घेऊन वादग्रस्त तहसीलदार, जिल्हा खनिकर्म विभागाचे अधिकारी ह्यांची चौकशी करून तात्काळ अहवाल प्राप्त करून नियमानुसार प्रभावी कार्यवाही करण्याची मागणी नागपुर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशन दरम्यान महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले असता त्यांनी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देवरा यांना आदेश देऊन तक्रारीच्या अनुषंगाने कोरपनाचे तत्कालीन तहसीलदार आणि अन्य 50 तहसीलदारांच्या विरोधात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल पठावण्याचे आदेश दिले आहे. (aamcha vidarbha) (korpana)


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top